पीएसएलव्ही सी-३७ हे भारतीय उपग्रह प्रक्षेपण यान आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने या प्रक्षेपकाद्वारे १०४ उपग्रह एकाचवेळी अंतराळात सोडण्याची तयारी केली आहे. पीएसएलव्ही या श्रेणीतील उपग्रहाचे हे ३७वे प्रक्षेपण आहे. याचे प्रक्षेपण दि. १५ फेब्रुवारी २०१७ला निर्धारीत केल्या गेले होते. त्यानुसार, भारताच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून याचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले.[][][]

हा भारताचा पूर्णपणे स्वदेशी असा प्रक्षेपक असून त्याचे सहाय्याने १०१ विदेशी व ३ भारताचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेत.[]

या १०१ उपग्रहांत अमेरिका,जर्मनी,इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलॅंड, स्वित्झर्लंड आणि फ्रांस या देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.याद्वारे कार्टोसॅट-२ श्रेणीतील उपग्रहही पाठविण्यात आले आहेत.यात ७३० किलोग्राम वजनाचा कार्टोसॅट२-डी आणि प्रत्येकी ३० किलोग्राम वजनाचे आय एन एस १-ए आय एन एस १-बी असे उपग्रह आहेत.[]

या प्रक्षेपण यानाद्वारे १०४ उपग्रह अवकाशात सोडून भारताने एक इतिहास रचला आहे.[][] यापूर्वी इस्रोने २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. याआधी अमेरिकेने एकाचवेळी २९ तर रशियाने एकाचवेळी ३७ उपग्रह अंतराळात पाठविले होते. [][][]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b लोकसत्ता (मराठी) PSLV C37 launch : 'अबतक १०४'; इस्त्रोने रचला इतिहास! Check |दुवा= value (सहाय्य). १५/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d ई-पेपर, तरुण भारत, नागपूर-मुख्य अंक विश्वविक्रमाकडे ईस्रोची वाटचाल Check |दुवा= value (सहाय्य). १५/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b c एकॉनॉमिक टाईम्स (इंग्रजी मजकूर) ISRO sends 104 satellites in one go, breaks Russia's record Check |दुवा= value (सहाय्य). १५/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ हिंदुस्तान टाईम्स चे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) ISRO sets space record: Highlights of successful launch of Cartosat-2 and 103 other satellites Check |दुवा= value (सहाय्य). दि. १५/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन