पिंपलोळी (अंबरनाथ)
पिंपलोळी ऊर्फ पिंपळोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे.
?पिंपलोळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अंबरनाथ |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनबदलापूरहून बारवी धरण मार्गाने मुरबाडला जाताना अंबरनाथ तालुक्याच्या वेशीच्या अगोदर पिंपळोली गाव लागते.[१]
हवामान
संपादनयेथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.गावात भाजीपाला आणि निरनिराळ्या भाताच्या जातींची लागवड केली जाते.भाजीपाला कल्याण आणि बदलापूर बाजारात विक्रीसाठी नेला जातो. भाजीपाल्यामध्ये काकडी, कारली, भेंडी, लाल भोपळा, मिरची, दोडका, शिराळी ह्यांचे उत्पादन घेतले जाते.ही पिके बारमाही घेतली जातात.[२]
लोकजीवन
संपादनयेथे मुख्यतः आदिवासी वस्ती आहे.गावात चौथी इयत्तेपर्यंत शिक्षणासाठी अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेची शाळा आहे.[३]
प्रेक्षणीय स्थळे
संपादनखादी ग्रामोद्योग महामंडळाने हे गाव मधाचे गाव म्हणून जाहीर केले आहे.[४]