पाताळगंगा नदी
पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात लोणावळा येथे होतो. ही नदी खोपोलीमार्गे पश्चिम दिशेस वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते.
महाभारतामध्ये भीष्म मृत्युशय्येवर असताना त्यांना तहान लागली असता अर्जुनाने जमिनीत बाण मारून पाणी वर आणले अशी दंतकथा आहे. या कुरुक्षेत्राजवळील पाताळगंगेचा, तसेच ज्या पाताळगंगेचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. ती पाताळगंगा ही नसावी.