भौगोलिक रचना

संपादन

पवना नदी पुणेपिंपरी चिंचवड येथून वाहणारी एक नदी आहे. सह्याद्रीमध्ये उगम होउन ही नदी साधारणतः पश्चिमेस वाहते व पुण्याजवळ मुळा नदीस मिळते.

प्रवाह

संपादन

१९९० नंतर पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे नदी अस्वच्छतेच्या विळख्यात सापडू लागली. ही नदी धरणामधून सोडल्या जाणा:या पाण्याच्या प्रवाहानुसार वाहते. पवनेचे पात्र अंदाजे दोनशे फूट रुदीचे आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या काले कॉलनी, ब्राrाणोली, कोथुर्णे, येळसे, शिवली, कडधे, आर्डव, करंज, थुगाव, बऊर, सडवली, ओझर्डे, शिवणो, उर्से या गावांच्या हद्दीतून पवनेचा प्रवाह सुरू होतो. नैसर्गिक उतार असल्याने उन्हाळय़ातही पाणी वाहत असते.

नदी काठची गावे पुढे मजल दरमजल करीत पवना पिंपरी-चिंचवड हद्दीत प्रवेश करते. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदीची लांबी अंदाजे २५ किलोमीटर. शहरातील किवळे, रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी या भागातून पवना नदी वाहत जाते.

भूशास्त्रीय रचना

संपादन

इतिहास

संपादन

पुरातत्त्वीय

संपादन

ऐतिहासिक घटना

संपादन

धार्मिक वैशिष्ठ्ये

संपादन

धन्य ती पवना माई - चिंचवड तीर्थक्षेत्री महान साधू मोरया गासावी यांची पवनातीरी संजीवन समाधी आहे. अष्टविनायक यात्रेत मोरया मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे.सदर मंदिर दर्शनाने यात्रेचा शेवट करण्याची प्रथा आहे. ह्या मंदिराला ४२५ वर्षापेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे. त्याचप्रमाणे पवनातीरी प्राचीन शिवमंदिर शेकडो वर्षांपासून धनेश्वर मंदिर या नावाने प्रसिद्ध असून ते सुद्धा चिंचवड गावाची महत्वपूर्ण ओळख आहे.

सांस्कृतिक वैशिष्ठ्ये

संपादन

जल व्यवस्थापन

संपादन

या नदीवर पवनानगर येथे धरण आहे.

पवनेवर १९७१ मध्ये पवना धरण बांधण्यात आले. पवनेचे उगमस्थान मावळ तालुक्याच्या पश्मिेकडील व रायगड-पुणे जिल्हय़ाच्या हद्दीजवळ आहे. तुंग किल्ला व लोहगडाच्या किल्याच्या खो:यात गेव्हंडे, आतवण, आपटी या गावांच्या हद्दीतून वाहणारा छोटासा पाण्याचा झरा. हे पवनेचे उगमस्थान. पवनानगर म्हणून हा परिसर ओळखला जातो. कालांतराने आजुबाजूचा परिसर हा तर पर्यटकांसाठी ‘पर्यटकांची पंढरीच’ होऊ लागला. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, हाडशी, मुळशीधरण असा सर्व परिसर पर्यटकांना साद देऊ लागला. पवना धरणावर जाऊन बोटींगचा मनसोक्त आनंद घेऊन फोटो सेशन करून मंडळी पुढील वर्षी परत येण्याचा निश्चिय करून घरी परतू लागली. पावसाळय़ात तर या ठिकाणी पर्यटकांची पंढरीच होऊ लागली आहे. मात्र, या पवना धरणातून वाहणा-या पवना नदीचे पुढे काय होते. हे मात्र, कोणीही पाहत नाही किंवा पाहूनही त्याबद्दल मला काय त्याचे? असा त्रयस्तपणा अंगी बाळगला जातो.

बंधारे

संपादन

Ravet Bandhara

कालवे

संपादन

अर्थशास्त्रीय वैशिठ्ये

संपादन

उपजीविका

संपादन

मासेमारी

संपादन

उद्योग

संपादन

पर्यटन

संपादन

पवनानगर येथील पवना डॅम परिसर पावसाळ्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठया प्रमाणात पुणेकर व मुंबईकर ह्या धरण परिसरात वर्षा विहार करण्यासाठी येत असतात.निसर्ग सौन्दर्याचा आनंद घेण्यासाठी जरूर ह्या परिसराला भेट द्या. मावळातील ह्या परिसराला युगप्रवर्तक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श मिळालेला आहे. अनेक धुरंधर मावळे ह्याच सहयाद्रीच्या परिसरात जन्मास आले. मुघलशाही असो की इंग्रजशाही ह्याच भूमीत त्यांना सुरुंग लावला गेला.

पायाभूत सुविधा

संपादन

पूल

दळणवळण

सांडपाणी व्यवस्थापन

जल वाहिन्या

व्यावसायिक वापर

तीर्थक्षेत्र (घाट, इ.) - पवना घाट संवर्धन मोहिमेअंतर्गत गौरी गणेश विसर्जन तसेच छट पूजा व धार्मिक कार्यक्रमानंतर घाट स्वच्छता व साफसफाई मोहीम दरवर्षी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने राबविण्यात येते अनेक पर्यावरण प्रेमी व पालिका स्वच्छता कर्मचारी सहभागी होत असतात.त्यामुळे आपले घाट संवर्धित होण्यास हातभार लागत असतो.शहरातील अनेक पर्यावरण प्रेमी व सामाजिक संस्था पवना नदी संवर्धन करीता विविध उपक्रम राबवित आहेत.पालिकेने गंभीरपणे आता पवना प्रदूषणरहीत करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे.

पर्यावरण

संपादन

परिसंस्था

संपादन

जैव विविधता

संपादन

वनस्पती

संपादन

प्राणी

संपादन

बाहेरचे / आक्रमक वनस्पती व प्राणी

पाण्याची गुणवत्ता

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरण जनजागृती करणारी अग्रगण्य संस्था असून नुकतेच पवना नदी काठी केलेल्या पक्षी निरीक्षण संपन्न केले (दिनांक १० नोव्हेंबर२०२२ ते १० डिसेंबर २०२२)त्यामध्ये पाणकोंबडी, बगळे, धनेश, खंड्या, गव्हाणी घुबड, बुलबुल ह्या पक्ष्यांमध्ये रावेत, वाल्हेकरवाडी नदी परिसरामध्ये वाढ नोंदवण्यात आली परंतु जलचर प्राण्यांमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली.

प्रदूषण

संपादन

पवना नदी प्रदूषण

संपादन

नदीच्या शेजारील लहान-मोठय़ा नाल्यांचे पाणी थेट पवनेत सोडले जाते. काही ठिकाणी सांडपाणी स्वच्छ करून पुन्हा नदीत सोडण्याचे तेवढे काम पालिका करते. वेळोवेळी नदी साफ करण्यासाठी टेंडर काढले जातात. अमाप पैसे ओतून सुद्धा नदी पुन्हा ‘जैसे थै’ परिस्थितीत राहते. पवना नदीची अक्षरशः गटारगंगा झाली असल्याचे दिसून येते.

नदीतील गाळाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. करोडो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र उभारूनही घाणपाणी, मैला, सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते. वाढत्या प्रदूषणामुळे नदीतील जलचर प्राण्यांची मोठय़ा प्रमाणावर घट झाली.

नदीपात्रत मासे मरून पडल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत.

जलपर्णीचे तर प्रमाण पवनेत प्रचंड प्रमाणात आहे. जलपर्णीवर तर नवीन लेखच लिहायला हवा. जलपर्णीमुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला. पवनेकाठच्या लोकांना या जलपर्णीचा डासांच्या स्वरूपात त्रस होऊ लागला आहे. अर्थातच आरोग्यास धोका निर्माण झाला.

नदीत मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येतो.

पवना नदीचा सर्वाधिक प्रदूषित भाग सांगवीत आहे. असल्याचा अहवाल खुद्द महपालिकेनेच दिला आहे. मैला, सांडपाणी, कारखान्यांमधून थेट नद्यांमध्ये घाण पाणी सोडल्यानं पाण्यात रसायनं आहेत. नदीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलंय.[]

मैलापाणी वहन

सांडपाणी

घन कचरा

राडारोडा

उद्योगांद्वारे सोडलेले उत्सर्जन

शेतीद्वारे होणारे उत्सर्जन

उघड्यावर शौच

सण, उत्सव, धार्मिक विधी मुळे होणारे प्रदूषण

समाजावर होणारे परिणाम

अतिक्रमणे

संपादन

वाल्हेकरवाडी, चिंचवड,पिंपरी रावेत,पिंपरी ,पिंपळे सौदागर,कासारवाडी,पिंपळे गुरव,सांगवी परिसरातील पवना नदी पात्रात (ब्लू लाईन) मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने कारवाई करणे महत्वाचे आहे तरच नदी श्वास व्यवस्थित घेऊन वाहू शकेल.

घातक उद्योग

संपादन

नैसर्गिक आपत्ती

संपादन

कार्यरत लोक चळवळी, संस्था, इ.

संपादन

पर्यावरण प्रेमी

संपादन

प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी आवाज उठविला. जनजागृती केली. परंतु महापालिका प्रशासनाला जाग येत नाही. इंद्रायणी बचाव कृती समिती सारख्या पर्यावरण समितीलाही केवळ महापालिकेला विनंत्या करण्यात वेळ घालवावा लागत आहे. त्यांच्याकडून नदी स्वच्छतेबाबत करण्यात आलेल्या सूचनांना केराची टोपली तेवढी मिळती.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती शहरातील नदी प्रदूषण साठी वेळोवेळी महापालिकेला सूचित करत असते. उद्योगांकडून होत असलेले प्रदूषण, रहिवाशी सांडपाणी व नाले मोठया प्रमाणात नदीमध्ये प्रदूषण करत आहेत.रावेत व वाल्हेकरवाडी गाडी धुण्याचे मोठ्या प्रमाणात काम चालते ते बंद होणे महत्वाचे.वाढत्या जलपर्णी काढण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर स्वतःचे जलपर्णी काढण्याचे मशीन घेणे महत्वाचे आहे.कोट्यवधी रुपये गेल्या १० वर्षात पालिकेने खर्च करूनही जलपर्णी ही जैसे थेच असते.सप्टेंबर ते मार्च ह्या महिन्यात वेगाने फोफावते. प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणेश विसर्जन पूर्णतः बंद होणे आवश्यक.नदीच्या प्रदूषणाची अशी महत्वाची 5 कारणे मुळासकट संपने महत्वाची आहेत. महाराष्ट्र नदी प्रदूषण मंडळानेही पालिकेला कडक शिक्षा करून प्रदूषण नष्ट करण्यासाठी थोड्या कालावधीची अंतिम मुदत द्यावी. (विजय पाटील - अध्यक्ष pnsks महाराष्ट्र राज्य)


जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान

संपादन

रोटरी क्लब ऑंॅंफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई (उगम ते संगम)' हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पहिले पर्व २०१७-२०१८ तब्बल २१५चालले. या अभियानामध्ये एकूण १४५५ ट्रक जलपर्णी पवना नदीतून बाहेर काढण्यात आली.जून महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने जून महिन्यात या अभियानाला थांबविण्यात आले होते. आता पावसाळा संपला असल्याने या अभियानाला पुन्हा सुरू करण्यात आले आहे.[]

पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना नदीला स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने घेतला आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व सामाजिक, पर्यावरणप्रेमी संघटनांना सोबत घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे.[][]

शासकीय परिपत्रके, अहवाल, न्यायालयीन आदेश, इ.

संपादन

साहित्य

संपादन

चित्रे

नाटक

चित्रपट

संदर्भ

संपादन
  1. ^ "पुणे महामेट्रो ने पवना नदी में कांक्रीट मटेरियल डालने से हो रहा प्रदूषण; पिम्परी चिंचवड़ नगरनिगम प्रशासन की लापरवाही". Reporter Today News (इंग्रजी भाषेत). 2019-08-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-02 रोजी पाहिले.
  2. ^ "पवना नदी :- श्वास.. कोंडतोय माझा.. | Maayboli". www.maayboli.com. 2019-08-02 रोजी पाहिले.
  3. ^ "पवना नदी ने खुले वातावरण में सांस ली : नदी से पांच ट्रक जलकुंभियां निकाली गईं - Pune Samachar". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-08-02 रोजी पाहिले.
  4. ^ "पवना नदी ने खुले वातावरण में सांस ली : नदी से पांच ट्रक जलकुंभियां निकाली गईं". पुणे समाचार (इंग्रजी भाषेत). 2019-08-02 रोजी पाहिले.