परतवाडा हे अमरावती जिल्हातील एक प्रमुख व्यापारी शहर आहे. हे शहर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलले आहे. येथून जवळच गाविलगड हा किल्ला आहे तर चिखलदरा हे  निसर्गरम्य पर्यटन स्थळ  परतवाडा येथून ३२ किलोमीटर  दूर आहे. परतवाडा हे एक राजकीय ,साहित्यिक आणि कलात्मक दृष्ष्टिकोनाने एक महत्त्वाचे शहर आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या बालपणातील ८ वर्षे या शहरात वास्तव्य केले. गो. नि. दांडेकर, अरुण साधू, गजानन मते, इ. साहित्यिक सुद्धा येथे वास्तव्याला होते. परतवाड़ा हे अचलपूर तालुका मध्ये वसलेले एक शहर आहे