पद्मश्री वॉरियर

भारतीय रासायनिक इंजीनियर आणि व्यापारिक कार्यकारी
Padmasree Warrior (it); পদ্মশ্রী ওয়ারিয়র (bn); Padmasree Warrior (fr); પદ્દમશ્રી વરિયાર (gu); Padmasree Warrior (gl); പദ്മശ്രീ വാര്യർ (ml); Padmasree Warrior (nb); Padmasree Warrior (ast); Padmasree Warrior (ca); पद्मश्री वॉरियर (mr); Padmasree Warrior (de); Padmasree Warrior (pt); Padmasree Warrior (ga); پادماسری واریور (fa); Padmasree Warrior (en); Padmasree Warrior (da); Padmasree Warrior (sl); パッドマスリー・ウォーリアー (ja); Padmasree Warrior (pt-br); Padmasree Warrior (mg); بادماسرى المحارب (arz); Padmasree Warrior (nn); פאדמסרי ווריור (he); Padmasree Warrior (nl); Padmasree Warrior (es); येलिपेड्डी पद्मश्री वारियर (hi); ಪದ್ಮಶ್ರೀ ವಾರಿಯರ್ (kn); పద్మశ్రీ వారియర్ (te); পদ্মশ্ৰী ৱাৰিৱৰ (as); Padmasree Warrior (sq); Padmasree Warrior (sv); பத்மாஸ்ரீ வாரியர் (ta) ingeniero de India (es); ingénieure chimiste et dirigeante indienne (fr); ભારતીય રાસાયણિક ઈજનેર અને વ્યાપારિક કાર્યકારી (gu); भारतीय रासायनिक इंजीनियर आणि व्यापारिक कार्यकारी (mr); indisch-amerikanische Ingenieurin und Unternehmerin (de); مهندس هندی (fa); indisk ingeniør (da); インドの化学技術者、実業家 (1961-) (ja); indisk ingenjör (sv); indisk ingeniør (nn); מהנדסת ואשת עסקים הודית אמריקאית (he); Indiaas ingenieur (nl); भारतीय रासायनिक इंजीनियर और व्यापारिक कार्यकारी (hi); Indian chemical engineer and business executive (en); indisk ingeniør (nb); مهندسه كيميائيه من الهند (arz); enxeñeira química da India (gl) Yellepeddi Padmasree Warrior (en)

पद्मश्री वॉरियर ह्या एनआयओ यूएसचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तसेच त्या त्यांच्या संचालक मंडळाच्या सदस्यही आहेत. एनआयओ ही अमेरिकेतील एक विद्युत वाहन कंपनी आहे. त्या कॅलिफोर्नियातील सान होजे शहरामध्ये राहतात. जेथे एनआयओचे मुख्यालय आहे. वॉरियर ह्या सिस्को सिस्टम्सच्या माजी प्रमुख टेक्नॉलॉजी आणि स्ट्रॅटजी ऑफिसर (सीटीओ) होत्या, आणि मोटोरोला इंकच्या पूर्व सीटीओ आहेत. फोर्ब्स मासिकानुसार त्या २०१४ साली जगातील ७१ वी सर्वात शक्तिशाली महिला म्हणून नोंद करण्यात आली आहे.[][]

पद्मश्री वॉरियर 
भारतीय रासायनिक इंजीनियर आणि व्यापारिक कार्यकारी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९६१, इ.स. १९६०
विजयवाडा
పద్మశ్రీ వారియర్
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • व्यावसायीक व्यक्ती
  • chemical engineer
नियोक्ता
सदस्यता
  • जेफरी बलेट (संचालक मंडळ)
  • विज्ञान आणि उद्योग संग्रहालय (संचालक मंडळ)
  • कॉर्निंग इन्क. (संचालक मंडळ, इ.स. २००५ – इ.स. २००८)
  • गॅप, इन्क. (संचालक मंडळ, इ.स. २०१३ – )
पद
  • मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
पुरस्कार
  • Women in Technology Hall of Fame (इ.स. २००७)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण

संपादन

वॉरियर यांचा जन्म भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा शहरात झाला. तिचा जन्म तेलुगू हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. पद्मश्रीचे शिक्षण विजयवाडा येथील चिल्ड्रन मॉंटेसरी स्कूल आणि मारिस स्टेला महाविद्यालयात पूर्ण झाले. १९८२ मध्ये वॉरियर यांनी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली येथून रसायन अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली, तर कॉर्नेल विद्यापीठ मधून रसायन इंजिनियरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतले.[][]

कारकीर्द

संपादन

मोटोरोला

संपादन

१९८४ मध्ये पद्मश्री वॉरियर यांनी मोटोरोला कंपनी मध्ये काम करण्यास सुरुवात केली. २३ वर्षे त्यांनी मोटोरोला कंपनीमध्ये काम केले, या कंपनीच्या 23 वर्षांच्या काळात त्यांनी कॉर्पोरेट व्हाईस-प्रेसिडेंट आणि मोटोरोला एनर्जी सिस्टम्स ग्रुपचा महाव्यवस्थापक आणि कॉर्पोरेट सेमीफाऊंडर प्रॉडक्ट्स विभागाच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम केले. मोटोरोलाच्या सीटीओ बनण्याच्या आधी त्यांनी मोटोरोलाच्या उत्पादनापैकी एक असणाऱ्या थॉटबीमचा सरव्यवस्थापक म्हणून काम केले. जानेवारी २००३ मध्ये, मोटोरोलाला सीटीओ असे नाव दिले, तेव्हा वॉरियर यांना वरिष्ठ उपाध्यक्ष बनविण्यात आले. आणि २००५ मध्ये त्यांना कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून पदोन्नती देण्यात आली.[]

सीटीओ म्हणून पद्मश्री वॉरियर यांचा कारकिर्दी दरम्यान, मोटोरोलाला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष यांनी २००४ मध्ये मोटोरोलाला नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीचा पुरस्कार दिला होता, मोटोरोला कंपनीला हा सन्मान पहिल्यांदाच मिळाला होता. ४ डिसेंबर २००७ रोजी, त्यांनी सिस्को सिस्टीममध्ये सीटीओ बनण्यासाठी मोटोरोला सोडली. जून २०१५ मध्ये घोषणा केली की त्या सिस्को सिस्टीमही सोडणार आहे.[]

सन्मान

संपादन
  • फॉर्च्यून मॅगझीनने त्यांना सर्वात प्रभावी महिलांच्या यादीत स्थान दिले आहे.
  • २००५ मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने वॉरियर यांना ११ व्या सर्वाधिक प्रभावशाली ग्लोबल इंडियन म्हणून घोषित केले.
  • २००१ मध्ये, महिला वर्किंग वूमन मॅगझीन कडून "महिला अस्तर विज्ञान आणि तंत्रज्ञान" पुरस्कार प्राप्त.
  • २०१४ मध्ये, फोर्ब्सने पद्मश्री वॉरियर यांना जगातील ७१वी सर्वात शक्तिशाली महिला म्हणून यादीत स्थान दिले आहे.

सभासद

संपादन
  • शिकागोच्या जोफ्री बॅलेट, म्युझियम ऑफ सायन्स ॲण्ड इंडस्ट्री, शिकागो महापौर टेक्नॉलॉजी कौन्सिल, कॉर्नेल विद्यापीठ अभियांत्रिकी कौन्सिल आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सल्लागार परिषदेच्या संचालक आहेत.
  • पद्मश्री वॉरियर यांनी डिजिटल इकॉनॉमीसाठी टेक्सास गव्हर्नर्स कौन्सिलवर काम केले आहे.
  • एफसीसी टेक्नोलॉजी ॲडव्हायझरी कौन्सिल आणि नॅशनल सायन्स फाऊंडेशन (एनएसएफ)च्या कम्प्युटिंग अँड इन्फॉर्मेशन सायन्स अँड इंजिनीयरिंगच्या सल्लागार समितीवरही काम केले आहे.
  • पद्मश्री वॉरियर यांनी २००५ पासून २००८ पर्यंत कॉर्निंग इन्कॉर्पोरेटेड कंपनीच्या संचालक मंडळावर काम केले.
  • ऑक्टोबर २०१३, मध्ये पद्मश्री वॉरियर गॅप इंक बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये सामील झाल्या.
  • डिसेंबर २०१५ मध्ये, पद्मश्री मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळामध्ये सामील झाल्या.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "The CEO of an electric vehicle startup said she's making the iPhone of cars - here's her plan". Business Insider. 2018-08-07 रोजी पाहिले.
  2. ^ "The CEO of an electric vehicle startup said she's making the iPhone of cars - here's her plan". Business Insider. |access-date= requires |url= (सहाय्य)
  3. ^ "IIT alumni dominate global Indian tech influencers list - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-08-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Padmasree Warrior - Advisor @ Sherpa Capital | Crunchbase". Crunchbase (इंग्रजी भाषेत). 2018-08-07 रोजी पाहिले.
  5. ^ "Padmasree Warrior - Cisco Systems, Inc. - VideoLectures.NET". videolectures.net (इंग्रजी भाषेत). 2013-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-07 रोजी पाहिले.
  6. ^ Savitz, Eric. "Cisco Names Padmasree Warrior Chief Technology Officer" (इंग्रजी भाषेत). 2018-08-07 रोजी पाहिले.
  7. ^ "Padmasree Warrior - Stories". Stories (इंग्रजी भाषेत). 2018-08-07 रोजी पाहिले.