फोर्ब्स ( किंवा फोर्ब्ज) हे अमेरिकन व्यवसायिक नियतकालिक आहे, ज्याची मालकी इंटिग्रेटेड व्हेल मिडिया कंपनी आणि फोर्ब्स फॅमिली यांच्याकडे आहे. हे वर्षातून ८ वेळा प्रकाशित होते, ज्याच्यात अर्थ, उद्योग आणि मार्केटिंग या विषयांवर लेख लिहले जातात.[१][२]

न्यूयॉर्क येथील फोर्ब्स कंपनीच्या मुख्यालयाची इमारत

ह्याचे मुख्यालय जर्सी सिटी, न्यू जर्सी येथे आहे. व्यवसायिक प्रकाशनाच्या प्रकारात फोर्ब्जचे फोर्च्युन आणि ब्लूमबर्ग बिझनेस वीक हे दोन प्रमुख स्पर्धक आहेत. फोर्ब्ज विविध इतर विषयांवरही अहवाल प्रसिद्ध करते, यात तंत्रज्ञान, संप्रेषण, विज्ञान ,राजकारण आणि कायदे या विषयांचा समावेश होतो.

फोर्ब्जची आंतरराष्ट्रीय आवृत्ती आशिया आणि जगभरातील इतर २७ देशांमध्ये परवान्यामध्ये प्रसिद्ध केली जाते.

संस्थेचे ब्रीदवाक्य "चेंज द वर्ल्ड" आहे. २०१४ मध्ये फोर्ब्ज हाँगकाँगच्या इंटिग्रेटेड व्हेल मिडिया इन्व्हेस्टमेंट्सला विकण्यात आले. [३]

यासाठी ओळखले जातेसंपादन करा

फोर्ब्ज हे त्याच्या विविध विषयांवरील आकडेवारी आणि याद्यांसाठी ओळखले जाते. यामध्ये सर्वात श्रीमंत अमेरिकन लोक (फोर्ब्ज ४००), अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी, जगातील अग्रणी कंपन्या(फोर्ब्ज ग्लोबल २०००), फोर्ब्जची जगातील सर्वात जास्त शक्तिशाली लोक आणि द वर्ल्ड बिलेनियर्स ह्या याद्या प्रसिद्ध आहेत.[४][५][६][७]


बाह्य दुवेसंपादन करा


संदर्भसंपादन करा

  1. ^ "Forbes". Investopedia (इंग्रजी भाषेत). 2021-12-31 रोजी पाहिले.
  2. ^ "Forbes & Company History | Forbes & Company Information". The Economic Times. 2021-12-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Forbes Media sold to Hong Kong's Integrated Whale" (इंग्रजी भाषेत). 2014-07-18.
  4. ^ "The 8 Best Business Magazines". The Balance Small Business (इंग्रजी भाषेत). 2021-12-31 रोजी पाहिले.
  5. ^ टीम, एबीपी माझा वेब. "World's Billionaires List 2021: फोर्ब्सकडून जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर, पहा कोण कितव्या स्थानी". ABP Marathi. 2021-12-31 रोजी पाहिले.
  6. ^ "pratima joshi on Forbes list of powerful women pune latest news | Forbes List: 'फोर्ब्स'च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी | Lokmat.com". LOKMAT. 2021-12-25. 2021-12-31 रोजी पाहिले.
  7. ^ "फोर्ब्सः सर्वात श्रीमंत 'टॉप-५' यादीत ४ गुजराती". Maharashtra Times. 2021-12-31 रोजी पाहिले.