पट्टागड

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला
(पट्टा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)


पट्टागड ऊर्फ विश्रामगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गड नगर-नाशिक जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील ’पट्ट्याची वाडी’ जवळ आहे.

पट्टागड

पट्टागड
नाव पट्टागड
उंची १३९२ मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपा
ठिकाण नगर, महाराष्ट्र
जवळचे गाव पट्टेवाडी
डोंगररांग कळसूबाईची रांग
सध्याची अवस्था अवशेष
स्थापना {{{स्थापना}}}

इतिहास

संपादन

बांधकाम

संपादन

या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात (इ.स. १३४७]]-इ.स. १४९०) झाले. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे गेला त्यानंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इ.स. १६२७ मध्ये मुगलांनी हा किल्ला जिंकला.

समुद्रसपाटीपासून ८८२ मीटर उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात शिरण्याअगोदर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर अवशेषरूपी प्रवेशद्वारातून किल्ल्यात जाता येते. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर शिरल्यावर एक उद्ध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर एक मीटर उंचीची हनुमान मूर्ती आहे. या मूर्तीच्या पुढे एक निसर्गनिर्मित, १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील एवढी घळ आहे. किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. सुळक्याला वळसा घालून पुढे गेल्यावर दोन सुळक्यांच्या मधला भाग तटबंदी करून बंद केला आहे. तटबंदी चांगल्या स्थितीत आहे. 

तटबंदीच्या पुढे गेल्यावर एक महाकाय दरड कोसळलेली दिसते. येथून पुढे जाता येत नाही. येथून पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्यामध्ये असलेल्या छोट्या जागेतून सरपटत जावे लागते. एका बाजूला दरी असल्याने पाय घसरण्याची भीती असते. गड फिरण्यास फारसा वेळ लागत नाही. हा गड ताम्हिणी घाटावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. कोकणाचे विहंगम दृश्य येथून दिसते. माणगावकडून गाडीमार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव लागते. तिथूनच याची चढण सुरू होते. फारसा प्रसिद्ध नसलेला कुर्डुगड पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे छत्रपती शिवाजीराजांचे सरदार होते. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत. म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ

संपादन

इ.स. १६७१ मध्ये पट्टा हा किल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला व स्वराज्यात सामील झाला.[१] इ.स. १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. छत्रपती शिवाजी महाराज ह्या वेळी जलनापुरात मोगलांवर चालून गेले. सोनेनाणे, जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान, महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. जालण्याची प्रचंड लूट झाली. ही बातमी मोगल सरदार रणमस्तखान ह्यास समजताच तो महाराजांच्या मागावर निघाला. दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजेची गती संथ होती. मोगली फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमण केलं. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली. छत्रपती शिवाजी महाराज, सेनापती हंबीरराव, धनाजी जाधव आघाडीवर होते , पण मोगलांचा जोर पाहता हंबीरराव ह्यांनी महाराजांना मागे घेऊन काही फौजेसह पट्टा गड जवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मोगली आक्रमण थोपवू लागले. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनीती निश्चित करण्यात आली. निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज २१ नोव्हेंबर इ.स. १६७९ या दिवशी नगर-नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नाव ‘विश्रामगड’ असे पडले. ह्यानंतर महाराज संभाजी राजांना पन्हाळगडी भेटण्यास गेले. दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि महाराज रायगडी निघाले. विश्रांती घेऊन ते पुढे कल्याणमार्गे रायगडावर पोहोचले.[२] . छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी पट्टा गडावर धावती विश्रांती घेतली म्हणून त्या गडास 'विश्रामगड' हे नाव ठेवलं. म्हणजे दक्षिण दिग्विजयाची सांगता होता होता "जालण्याची लूट" करताना झालेली लढाई ही महाराजांची शेवटची लढा.

चित्रदीर्घा

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन