धनाजी जाधव

धनाजी जाधव


धनाजीराव जाधवराव (जन्म : इ.स. १६५०; - २७ जून १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली.

'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' या लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित नाटकात तुळापूर छावणी वरील धाडसी हल्ल्याचा प्रसंग रोमहर्षक पद्धतीने प्रस्तुत केलेला आहे. या हल्ल्यात सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या युद्धविषयक नियमांचा (धार्मिक पूजाअर्चना करताना कोणास मारू नये) आदर करत मोगल बादशाह औरंगजेब यास कोणतीही इजा केली नाही परंतु छावणीचे कळस कापून नेत मोगल सैन्यात धडकी भरवली. यातून संताजी- धनाजी यांचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम तसेच राजाराम महारांच्या सुखरूपतेसाठी केलेल्या पराक्रम पराकाष्टेचे रेखांकन करण्यात आलेले आहे[][].

संताजी मरण पावल्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धनहून साताऱ्याला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. धनाजी जाधव यानी शाहूमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथमतः पेशवाईची सूत्रे मिळाली.

सरसेनापती धनाजी जाधव यांची समाधी स्मारक - कोल्हापूर जिल्ह्यामधील पेठ वडगांव (तालुका हातकणगले) येथे आहे.

चरित्रे / साहित्य

संपादन
 
Bhangale Swapn Maharashtra @Bharat Naty Mandir 1st show on Republic Day, 1976
  • सदाशिव शिवदे यांनी धनाजी जाधव यांचे चरित्र लिहिले आहे.
  • सेनापती धनाजी जाधव (चरित्र, लेखक - प्रा. डॉ. उत्तम हनवते)
  • भंगले स्वप्न महाराष्ट्राचे (लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित ऐतिहासिक नाटक)


  1. ^ फड रंगला तमाशाचा - मोमीन कवठेकर यांची मुलाखत, "आकाशवाणी पुणे केंद्र", २०१९
  2. ^ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान "दै.लोकमत”,पुणे, 12-Nov-2021