पचडी (तेलुगू: పచ్చడి, कन्नड: ಪಚಡಿ, तमिळ: பச்சடி, मल्याळम: പച്ചടി) हा एक तोंडी लावायला किंवा सोबतीला म्हणून दिल्या जाणारा पारंपारिक दक्षिण भारतीय ताजा कोशिंबीर सदृश पदार्थ आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये, पचडी ही उत्तर भारतीय रायतासारखीच एक साइड डिश आहे आणि ती भाजी, दही, नारळ, आले आणि कढीपत्ता आणि मोहरीसह तयार केली जाते. पचडी ही साधारणपणे गरम किंवा हलके मसालेदार खोबरे, हिरवी मिरची, लाल मिरची आणि दही-आधारित डिश आहे जो हंगामी भाज्या किंवा फळे वापरून बनवला जातो. [१]

पचडी
केळीच्या पानावरील अन्न पदार्थ
प्रकार कोशिंबीर
प्रदेश किंवा राज्य दक्षिण भारत
मुख्य घटक ताज्या भाज्या, दही

हे ताज्या भाज्यांपासून बनवले जाते भात आणि इडली, डोसा आणि पेसरट्टू यांसारख्या पदार्थासोबत तोंडी लावायला म्हणून दिले जाते. यात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश होतो. कधी कधी भाजीच्या सालीचा वापर केला जातो, जसे की कडवट करवंदाची साल, ज्याला तेलुगुमध्ये बिरापोट्टू पचडी असे म्हणतात.[२]

संदर्भ संपादन करा

  1. ^ "Onam special: Here's what a traditional Onam sadhya consists of". 2016-09-13. 2016-09-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Beera Pottu Kura". Ptitchef- Women's era. 17 May 2012 रोजी पाहिले.