डोसा हा एक दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे. हा तांदूळ व डाळीचे पीठ आंबवून तयार केला जातो. रवा डोसा, मसाला डोसा, मुगाचे डोसे असे याचे विविध प्रकार असतात. सामान्यतः हा पदार्थ बटाट्याची भाजी, सांबार आणि चटणीबरोबर खाल्ला जातो.