न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३
न्यू झीलंड क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१] एकदिवसीय सामने चॅपेल-हॅडली चषकसाठी खेळले गेले आणि पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग होते.[२][३] मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[४]
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | ६ – ११ सप्टेंबर २०२२ | ||||
संघनायक | ॲरन फिंच | केन विल्यमसन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टीव्ह स्मिथ (१६७) | केन विल्यमसन (८९) | |||
सर्वाधिक बळी | ॲडम झम्पा (७) | ट्रेंट बोल्ट (१०) | |||
मालिकावीर | स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) |
१० सप्टेंबर २०२२ रोजी, अॅरन फिंचने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली परंतु ट्वेंटी२० मध्ये खेळात राहण्याचे ठरवले[५]
पार्श्वभूमी
संपादनमुळात हा दौरा जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार होता.[६] २८ मे २०२० रोजी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे सामने निश्चित केले.[७][८] तथापि, सप्टेंबर २०२० मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२०-२१ बिग बॅश लीग हंगामाच्या शेवटच्या सामन्यांच्या वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्यासाठी, मालिका संपूर्णपणे फेब्रुवारी २०२१ मध्ये हलविण्याचा विचार करत होते.[९] त्याच महिन्यात नंतर, कोविड-१९ महामारीमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला.[१०] क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे २०२१ मध्ये सुधारित वेळापत्रक जाहीर केले.[११] १९ जानेवारी २०२२ रोजी, न्यू झीलंडचे खेळाडू मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या विलगीकरणाच्या आवश्यकतेच्या अनिश्चिततेमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला.[१२][१३]
पथके
संपादनऑस्ट्रेलिया[१४] | न्यूझीलंड[१५] |
---|---|
मालिका सुरू होण्यापूर्वी, मिचेल मार्शच्या जागी जॉश इंग्लिसला ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील करण्यात आले.[१६] तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला, मार्कस स्टोइनिस साइड स्ट्रेनमुळे वगळण्यात आले आणि डेव्हिड वॉर्नरला सुद्धा मोकळे केले गेले,[१७] आणि नॅथन एलिसचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश केला गेला[१८]
२०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण: ऑस्ट्रेलिया १०, न्यू झीलंड ०.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड क्षेत्ररक्षण.
- ॲडम झाम्पाचे (ऑ) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[१९]
- क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण: ऑस्ट्रेलिया १०, न्यू झीलंड ०.
३रा सामना
संपादन
संदर्भयादी
संपादन- ^ "ऑस्ट्रेलियाज क्रिकेट शेड्युल इज इनसेन ऍज एपिक जर्नी इज रिव्हील्ड". फॉक्स स्पोर्ट्स. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम २०१८-२०२३ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२-२३ साठी ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय सामने जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "फिंचची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा". cricket.com.au (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट आस्ट्रेलियातर्फे २०२०-२१साठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Australia announce dates for summer fixtures". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यासह मैदानात परतणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड मालिका हलवून ब्रॉडकास्टरसाठी बिग बॅश लीगसाठी मार्ग मोकळा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडच्या घरच्या उन्हाळी आंतरराष्ट्रीय मोसमाला हिरवा कंदील, परंतु ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा दौरा पुढे ढकलला". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाज टेस्ट ड्रॉट पोजेस पॉसिबल ऍशेस प्रॉब्लेम्स". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडचा मर्यादित षटकांचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलला". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "मायदेशी परतण्याची कोणतीही हमी नसताना ब्लॅक कॅप्सचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलण्यात आला". स्टफ. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ॲडम झाम्पा परतला, झिम्बाब्वे, न्यू झीलंडविरुद्धच्या वनडेसाठी पॅट कमिन्सला विश्रांती". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी न्यू झीलंडच्या वनडे संघात वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]]. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "टी२० विश्वचषकाला प्राधान्य देऊन मिचेल मार्श एकदिवसीय मालिकेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड विरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्याला स्टॉइनिस साइड स्ट्रेनमुळे मुकणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "वॉर्नर, स्टॉइनिस न्यू झीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून बाहेर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ॲडम झाम्पा चमकला आणि अॅरन फिंच पुन्हा अपयशी, ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा पराभव करून वनडे मालिका जिंकली". एबीसी न्यूझ. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.