निलेश साबळे

मराठी दूरदर्शन निवेदक आणि अभिनेते
(नीलेश साबळे या पानावरून पुनर्निर्देशित)


डॉ. निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन निवेदक आणि चित्रपट अभिनेते आहेत.[] त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, दहिवडी येथून घेतले आहे.[]

निलेश साबळे
जन्म ३० जून, १९८६ (1986-06-30) (वय: ३८)
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता, निवेदक, डॉक्टर आणि दिग्दर्शक
कारकिर्दीचा काळ २०१० पासून
प्रसिद्ध कामे चला हवा येऊ द्या, [फू बाई फू (मालिका)
मूळ गाव पुणे
उंची १.७६ मी
जोडीदार
गौरी साबळे (ल. २०१३)

प्रारंभिक जीवन

संपादन

तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एमएस पदवीधर आहे.[][]

कारकीर्द

संपादन

झी मराठी वरील रिॲलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकून आपल्या कारकिर्दीस याने सुरुवात केली. त्यानंतर त्याला प्रसिद्धी होम मिनिस्टर, एक मोहोर अबोल व फू बाई फू या मालिकेंमार्फत मिळाली. त्याने नायक म्हणून नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं.[] तो सध्या झी मराठी वरील विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या यांचे निवेदन करत असून तो उत्तम सूत्रसंचालनही करतो.

सूत्रसंचालनाबरोबरच विविध अभिनेत्यांच्या नक्कलही तितक्याच प्रभावीपणे त्याने केलेल्या आहेत. विनोदाची अचूक वेळ जाणणारा, प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा हा अभिनेता आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून मराठी प्रेक्षकांमध्ये या टीमने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. निलेश साबळे यांनी २०२४ मद्ये चला हवा येऊ द्या या मराठी वरील विनोदी कार्यक्रमातून तात्पुरता बाहेर पडायचा निर्णय घेतला.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "We want to give a platform to out-of-the-box talent: Dr Nilesh Sable - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-08-14 रोजी पाहिले.
  2. ^ "निलेश साबळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करिता सेट". बेनेट, कोलमन ॲण्ड कंपनी लि. ८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "निलेश साबळे: एक वेगळा होस्ट". आफ्टरनुन डी सी. 2012-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "Dr Nilesh Sable recalls his journey from a doctor to an actor - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-08-14 रोजी पाहिले.
  5. ^ "चित्रपट नवरा माझा भवरा विशेष गाणे चित्रित". बेनेट, कोलमन ॲण्ड कंपनी लि. ८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "Nilesh Sable Exits "Chala Hawa Yeu Dya" नीलेश साबळे चला हवा येऊ द्या सोडणार? - MahaRojgar" (इंग्रजी भाषेत). 2024-02-27. 2024-02-26 रोजी पाहिले.