नीलम पोळ
नीलम पोळ (जन्म १९८१) या एक उद्योजक आणि खेल प्लॅनेट फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत.[१][२][३] त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.[४] त्या मुंबईत राहतात.[५]
नीलम पोळ | |
---|---|
जन्म |
१९८१ मुंबई, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
प्रशिक्षणसंस्था | हार्वर्ड विद्यापीठ |
पेशा | खेल प्लॅनेट फाउंडेशनच्या संस्थापिका |
प्रसिद्ध कामे | २१व्या शतकातील शिक्षण आणि सामाजिक उद्योजकता |
धर्म | हिंदू |
जोडीदार | सौरभ अग्रवाल |
वैयक्तिक जीवन
संपादननीलम यांचा जन्मापासूनच उजव्या हाताच्या फोकोमेलिया होता. हा एक कायमस्वरूपी, नॉन-प्रोग्रेसिव्ह, शारीरिक अपंगत्व आहे ज्यामध्ये उजवा हात डाव्या हातापेक्षा लहान असतो.[२]
शिक्षण
संपादननीलम पोळने हार्वर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.[६] त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खडगपूर येथून स्ट्रॅटेजी मॅनेजमेंटमध्ये एमबीए पूर्ण केले.[७] त्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठातून संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकी पदवीधर आहे.
त्या जागतिक बँकेच्या स्कॉलर आणि व्हाइटल व्हॉईस फेलो आहेत. यांना हार्वर्ड विद्यापीठाने २०१४ मध्ये एज्युकेशन आंत्रप्रेन्योरशिप फेलोशिप देखील प्रदान केली होती.
कारकिर्द
संपादननीलम पोळ यांनी इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेर अभियंता म्हणून कारकेर्दीचीची सुरुवात केली. त्यांनी नंतर आय.बी.एम. आणि टेक महिंद्रा सारख्या कंपन्यांमध्ये काम केले. जिथे त्यांनी शिक्षणतज्ज्ञ होण्यापूर्वी व्यवसाय विक्री, विपणन आणि ऑपरेशन्स मॅनेजरमध्ये काम केले.[५]
त्यांनी २०१२ मध्ये कॉर्पोरेट कारकीर्द सोडली. ग्रामीण भारतातील तळागाळात सरकारी शाळांमध्ये काम करण्यासाठी वेळ घालवला आणि शालेय नेतृत्वावर लक्ष केंद्रित केले.[८]
२०१४ मध्ये, नीलम पोळ यांनी ना-नफा संस्था खेल प्लॅनेट फाउंडेशनची सह-स्थापना केली. ज्याचा उद्देश मुलांना त्यांची पूर्ण क्षमता विकसित करण्यात मदत करणे आहे.[१][५] २०१५ मध्ये, एसई फोरमने आयोजित केलेल्या स्वीडनमधील सोशल एंटरप्रेन्युअर्स फोरममध्ये उपस्थित राहण्यासाठी नीलमची सर्वोच्च सामाजिक उद्योजकांमध्ये निवड झाली.[९]
त्या युनिसेफ इंडियाच्या कार्यक्रम विशेषज्ञ, इनोव्हेशन आहेत. भूतकाळात त्यांनी जागतिक बँकेत शिक्षण सल्लागार म्हणूनही काम केले आहे. जिथे बिहार सरकारच्या शिक्षकांची प्रभावीता वाढविण्याच्या प्रकल्पासाठी ऑन-ग्राउंड अंमलबजावणी समर्थनाचे नेतृत्व करत होत्या. आरयुएसए कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, राज्यातील उच्च शिक्षण सुधारण्याच्या दिशेने काम करत असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या नाविन्यपूर्ण आणि धोरण सल्लागार देखील आहेत.
नीलम पोळ हे अनुकूली नेतृत्वाचे अभ्यासक आहेत आणि तरुण पदवीधरांच्या गटाला उद्याचे सामाजिक बदलाचे एजंट बनण्यास मदत करण्यासाठी ते नेतृत्व मार्गदर्शक आहेत.[७] त्यांनी विविध कार्यक्रम आणि महाविद्यालयांशी संवाद साधला आहे.[१०][११][१२]
संदर्भ
संपादन- ^ a b "Khel Planet Foundation | Devex". www.devex.com. 2018-11-26 रोजी पाहिले.
- ^ a b "Meet five women who say #MainBeautiful". femina.in (इंग्रजी भाषेत). 2018-11-26 रोजी पाहिले."Meet five women who say #MainBeautiful". femina.in. Retrieved 2018-11-26.
- ^ "A Planet to Play on". www.redelephantfoundation.org. 2018-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.
- ^ "2014 Education Innovation Pitch Competition". Harvard Graduate School of Education (इंग्रजी भाषेत). 2019-07-07 रोजी पाहिले.
- ^ a b c "Neelam Pol | Changemakers". www.changemakers.com (इंग्रजी भाषेत). 2018-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले."Neelam Pol | Changemakers" Archived 2018-11-26 at the Wayback Machine.. www.changemakers.com. Retrieved 2018-11-26.
- ^ "Neelam Pol". HuffPost India (इंग्रजी भाषेत). 2018-11-26 रोजी पाहिले.
- ^ a b "Pol_Neelam-e1385086219162 - Asia Leadership Trek". www.asialeadershiptrek.org (इंग्रजी भाषेत). 2018-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले."Pol_Neelam-e1385086219162 - Asia Leadership Trek" Archived 2018-11-26 at the Wayback Machine.. www.asialeadershiptrek.org. Retrieved 2018-11-26.
- ^ "About - Khel Planet - Play for 21st century life skills I An Education Non-profit". Khel Planet - Play for 21st century life skills I An Education Non-profit (इंग्रजी भाषेत). 2018-11-26 रोजी पाहिले.
- ^ "Neelam Pol". SE Forum (इंग्रजी भाषेत). 2018-03-02. 2019-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-07 रोजी पाहिले.
- ^ "Vidyalankar Dnyanapeeth Trust". alumni.vidyalankar.edu.in. 2019-07-07 रोजी पाहिले.
- ^ "Ashoka India brings country's innovative schools & pioneering entrepreneurs together in its first Changemaker Conclave in India". News18. 6 September 2015. 2019-07-07 रोजी पाहिले.
- ^ "Entrepreneurship & Startup Opportunities for Professionals (IEEEBS ESOP)". IEEE Bombay Section (इंग्रजी भाषेत). 2017-08-14. 2020-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-07 रोजी पाहिले.