टेक महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि टेक महिंद्रा ही US$ ५.२ अब्जाची कंपनी आहे.[१][२] ह्या कंपनीचे ९० देशांमध्ये १,२५,२३६ कर्मचारी आहेत. २०१९ च्या फॉर्च्यून इंडिया ५०० यादीत कंपनीने भारतातील IT कंपन्यांमध्ये #५ आणि एकूण #४७ क्रमांकावर आहे.[३] २५ जून २०१३ रोजी, टेक महिंद्राने महिंद्रा सत्यममध्ये विलीनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली.[४] एप्रिल २०२० पर्यंत टेक महिंद्राचे ९७३ सक्रिय ग्राहक आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ "Tech Mahindra". techmahindra.com. TechMahindra. January 1, 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Tech Mahindra & U.S. Based Orbic Partner to Develop a '5G Device Portfolio' For the Global Markets". AP NEWS. 2019-02-27. 2019-03-25 रोजी पाहिले.
  3. ^ "Tech Mahindra - Fortune 500 List 2019". Fortune. Archived from the original on 2022-03-02. 2022-03-02 रोजी पाहिले.
  4. ^ "1:8.5 swap for Tech Mahindra, Mahindra Satyam merger". The Hindu. Chennai, India. June 25, 2013.