नारोशंकर
नारोशंकर राजेबहाद्दूर (इ.स. १७०७ ते इ.स. १७७५) हे पेशवाईतील एक मुत्सद्दी, पराक्रमी व चतुर सरदार समजले जात. शिवाजी महाराजांनी बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे व त्यांचे मुलगे ह्या जुन्या लढवय्यांच्या जागी प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, इत्यादी नवे सरदार व मुत्सद्दी तयार केले. संभाजी-राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे, धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, दाभाडे, नेमाजी शिंदे, केसोपंत पिंगळे, कान्होजी भोसले पुढे सरसावले. हे आपणांस उपयोगी पडतील की नाही या शंकेने शाहू व पेशवे यांनी पिलाजी व दमाजी गायकवाड, राणोजी व इतर शिंदे, मल्हारराव होळकर आनंदराव, यशवंतराव व उदाजीराव पवार, रघुजी फत्तेसिंग व इतर भोसले, पिलाजी जाधव, पटवर्धन, हरिपंत फडके इत्यादी पहिल्या प्रतीचे व विसाजी कृष्ण, विठ्ठल शिवदेव, गोविंदपंत बुंदेले, रामचंद्र काकडे इत्यादी लोकांना सरदार बनवले. होळकरांच्या पदरी असलेले नारोशंकर हेही त्याच वेळी उदयास आले.
नारोशंकरांचे वडील शंकरपंत दाणी मुळचे सासवडचे असून विजापुरात दिवाण होते. शंकरपंत वारल्यावर दिवाणपद गेले. मराठ्यांची गादी सातारला आल्यावर हे कुटुंब सासवडला व नंतर पुण्यात आले. शंकरपंतांना तीन मुले- आबाजी, लक्ष्मण आणि नारायण ऊर्फ नारोशंकर. घरातील कटकटी वाढल्याने नारोशंकर सासुरवाडीला म्हणजे नासिकला गेले. नासिकच्या बडवे मंडळींनी ओझर गावच्या तांबट मंडळींना लुटले त्याची तोशीस नारोशंकर यांना लागली, म्हणून ते परत सासवडला आले. भावजयीशी पटेना म्हणून नारोशंकर बायकोला एका सावकाराकडे ठेवून उपजीविकेसाठी ’वानला’ या गावी आले.
वानला गावातील सावकाराचा एक घोडा खूप आजारी झाला. त्याला औषधोपचाराने बरा केल्याबद्दल सावकाराने नारोशंकरांना दोन हजार रुपये दिले व आपल्या पदरी महिना दीडशे रुपयांच्या नोकरीवर ठेवले. पुढे सावकाराशी खटके उडू लागल्याने नारोशंकर होळकरांकडे आले आणि इ.स. १७३५ पासून त्यांची चाकरी करू लागले. एक लढाऊ शिपाई म्हणून होळकरांनी नारोशंकरांची पेशव्यांकडे शिफारस केली. बाजीराव पेशव्यांनी आदेशावरून नारोशंकर यांनी ओरिसाकडे कूच केले. वाटेत टिकमगड जिल्ह्यातील ओरछाच्या राजाचे नारोशंकरांशी भांडण झाले, तेव्हा त्यांनी ओरछाच्या राजाकडून अठरा लाख रुपयांचा खजिना मिळवून पेशव्यांना आणून दिला. बाजीराव पेशव्यांनी नारोशंकरांना ओरछाचा व इंदूरचा सुभेदार केले. इ.स. १७४२ मध्ये पेशव्यांनी त्यांना राजेबहाद्दूर हा किताब दिला.
नारोशंकर यांचा सहभाग असलेल्या लढाया
संपादन- पानिपतची लढाई
- निजाम व हैदरअल्ली यांच्याशा झालेल्या लढाया
(अपूर्ण)