नकेर, नकटा, नंदिमुख (इंग्लिश: Nakta, comb Duck) हा एक पाणपक्षी आहे.

Knob-billed Duck (female) I IMG 0957

नाकेर आकाराने बदकापेक्षा मोठा असतो.त्याचा वरून रंग काळा असतो. त्यावर हिरवी व निळी झाक असते.खालील भागाचा रंग पांढरा असतो.डोक्यावरमानेवर काळे ठिपके असतात.उडताना पंखावर ठळक पांढरा डाग दिसतो.नराच्या चोचीवर नाक असते. म्हणून त्याला नाकेर म्हणतात.म्हणून इंग्रजीत त्याला कॉम्ब डक म्हणतात.नाकेर व नाकेरी दिसायला सारखेच असतात.परंतु नाकेरी बारक्या चणीची असते.तिच्या चोचीवर नाक नसते.विणीच्या हंगामात नाकेराच्या कोंब जांभळा एवढा असतो.नाकेर स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी असतो.पाकिस्तान सिंधभारतात नेपाळ तराईपासून ते दक्षिणेकडे कर्नाटक आणि पूर्वेकडे बांगला देश ते ब्रह्मदेश आढळतात.नाकेर दलदल असलेली सरोवरे आणि भातशेतीच्याप्रदेशात आढळतो.

संदर्भ संपादन

  • पक्षीकोश - मारुती चीतमपल्ली