नाकानोशिमा (कागोशिमा)

नाकानोशिमा (中之島?) हे तोकारा द्वीपसमुहात स्थित एक ज्वालामुखीमुळे बनलेले बेट आहे. हा भाग कागोशिमा प्रीफेक्चर, जपान येथे आहे. तोशिमा गावातील बेटांपैकी हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट आहे. या बेटाचे क्षेत्रफळ ३४.४७ चौरस किमी (१३.३१ चौ. मैल) आहे. येथे स.न २००५ पर्यंत १६७ रहिवासी होते. या बेटावर कोणतेही विमानतळ नाही आणि मुख्य भूभागावरील कागोशिमा शहरात सात तासांच्या अंतरावर आहे. बेटवासी प्रामुख्याने शेती, मासेमारी आणि हंगामी पर्यटनावर अवलंबून आहेत. येथे एक वेधशाळा आणि स्थानिक संग्रहालय इतिहास आणि येथील लोककथा प्रसिद्ध आहेत.

नाकानोशिमा
Native name:
जपानी: 中之島
Geography
स्थान पूर्व चीन समुद्र
Coordinates 29°51′0″N 129°52′12″E / 29.85000°N 129.87000°E / 29.85000; 129.87000
Archipelago तोकारा द्वीपसमूह
क्षेत्रफळ साचा:Convinfobox/pri2
लांबी ९ km (५.६ mi)
रुंदी ५ km (३.१ mi)
Coastline ३१.८ km (१९.७६ mi)
Highest elevation ९७९ m (३,२१२ ft)
Highest point Otake
Administration
जपान
Kagoshima Prefecture
Demographics
Population १६७ (२००४)
Pop. density ४.८४ /km (१२.५४ /sq mi)
Ethnic groups Japanese

भूगोल

संपादन
 
विवर

नाकानोशिमा हे टोकारा द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. ज्याचे परिमाण ९ किलोमीटर (५.६ मैल) आहे ५ किलोमीटर (३.१ मैल) . हे बेट क्युशूच्या दक्षिणेला १५० किलोमीटर (८१ nmi) अंतरावर स्थित आहे.

बेटाच्या उत्तरेकडील टोकावर ओटाके (御岳 O-take?)[] हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे. याचा १९१४ मध्ये शेवटचा उद्रेक झाला होता. १९४४ पर्यंत पर्वतावर सल्फरचे उत्खनन करण्यात आले. समुद्रसपाटीपासून याची उंची ९७९ मीटर (३,२१२ फूट) आहे. हा पर्वत समुद्राच्या तळापासून उद्भवलेल्या सक्रिय स्ट्रॅटोव्होल्कॅनाच्या आकाराचा उघडा शंकू आहे.

एक लहान पठार ओटेकला दुसऱ्या ज्वालामुखीच्या क्षीण अवशेषांपासून वेगळे करते. स्थानिक हवामानाचे वर्गीकरण उपोष्णकटिबंधीय म्हणून केले जाते. येथे मे ते सप्टेंबर दरम्यान पावसाळी हंगाम असतो.

हवामान

संपादन
Nakanoshima (2003−2020 normals, extremes 2002−present) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 21.7
(71.1)
24.0
(75.2)
24.8
(76.6)
25.9
(78.6)
31.1
(88)
31.8
(89.2)
34.0
(93.2)
35.2
(95.4)
32.2
(90)
30.6
(87.1)
26.2
(79.2)
23.1
(73.6)
35.2
(95.4)
सरासरी कमाल °से (°फॅ) 14.2
(57.6)
15.3
(59.5)
17.3
(63.1)
20.6
(69.1)
23.8
(74.8)
26.0
(78.8)
29.6
(85.3)
30.1
(86.2)
28.2
(82.8)
24.7
(76.5)
20.7
(69.3)
16.3
(61.3)
22.23
(72.02)
दैनंदिन °से (°फॅ) 11.1
(52)
12.0
(53.6)
13.7
(56.7)
16.8
(62.2)
20.3
(68.5)
23.4
(74.1)
26.4
(79.5)
26.7
(80.1)
24.9
(76.8)
21.4
(70.5)
17.5
(63.5)
13.1
(55.6)
18.94
(66.09)
सरासरी किमान °से (°फॅ) 7.6
(45.7)
8.3
(46.9)
9.8
(49.6)
12.6
(54.7)
16.4
(61.5)
21.0
(69.8)
24.0
(75.2)
24.0
(75.2)
22.0
(71.6)
18.2
(64.8)
14.0
(57.2)
9.8
(49.6)
15.64
(60.15)
विक्रमी किमान °से (°फॅ) −1.1
(30)
−1.3
(29.7)
0.5
(32.9)
1.0
(33.8)
5.6
(42.1)
11.6
(52.9)
17.2
(63)
17.7
(63.9)
14.8
(58.6)
7.2
(45)
4.0
(39.2)
2.0
(35.6)
−1.3
(29.7)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 196.7
(7.744)
219.6
(8.646)
276.3
(10.878)
286.1
(11.264)
367.3
(14.461)
757.9
(29.839)
323.9
(12.752)
193.4
(7.614)
320.8
(12.63)
238.3
(9.382)
256.5
(10.098)
204.8
(8.063)
३,६४१.६
(१४३.३७१)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 1.0 mm) 15.4 13.8 14.0 12.7 13.9 18.4 10.0 11.8 13.4 11.4 11.9 15.2 161.9
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 66.4 69.9 106.6 133.8 128.9 70.9 127.1 155.1 120.4 135.7 101.1 72.9 १,२८८.८
स्रोत: Japan Meteorological Agency[][]

इतिहास

संपादन

नाकानोशिमा अनेक हजार वर्षांपासून वसलेले बेट आहे. हे बेट एकेकाळी र्युक्यु साम्राज्याचा भाग होते. इडो कालावधीत, नाकानोशिमा सत्सुमा डोमेनचा भाग होता आणि कवाबे जिल्ह्याचा भाग म्हणून प्रशासित होता. स.न १८९६ मध्ये, हे बेट ओशिमा जिल्हा, कागोशिमाच्या प्रशासकीय नियंत्रणाकडे हस्तांतरित करण्यात आले. स.न. १९११ पासून तोशिमा, कागोशिमा गावाचा एक भाग म्हणून प्रशासित करण्यात आले. स.न १९४६ ते १९५२ पर्यंत, उत्तर र्युक्यु बेटांच्या तात्पुरत्या सरकारचा भाग म्हणून हे बेट युनायटेड स्टेट्सद्वारे प्रशासित होते. स.न १९५६ पर्यंत, तोशिमा गावासाठी व्हिलेज हॉल नाकानोशिमा येथे होता. त्यानंतर ते कागोशिमा शहरात स्थलांतरित करण्यात आले.

स.न १९५० च्या सुरुवातीस, बेटाच्या दक्षिणेकडील जंगली घोड्यांच्या एका लहान कळपाची ओळख तोकारा पोनी नावाची एक वेगळी जात होती. ही प्रजाती फक्त नाकानोशिमावर आढळते. स.न १८९० च्या सुमारास अमामी ओशिमा जवळील किकाजिमा बेटावरून बेटावर आणली गेली असे मानले जाते. द्वितीय विश्वयुद्धानंतर, ही प्रजाती जवळजवळ नामशेष झाली. त्यातून बचावलेल्यांना संरक्षणासाठी मुख्य भूभाग कागोशिमा विद्यापीठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कुरणात ठेवण्यात आले. आज, यातील काही नाकानोशिमामध्ये पुन्हा दिसून येतात.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "NAKANO-SHIMA". Quaternary Volcanoes in Japan. Geological Survey of Japan, AIST. 2006. December 19, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-24 रोजी पाहिले.
  2. ^ 観測史上1~10位の値(年間を通じての値). JMA. March 16, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ 気象庁 / 平年値(年・月ごとの値). JMA. March 16, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Oklahoma State University - Breeds of Livestock - Tokara Horse Archived 2013-01-04 at the Wayback Machine.

इतर संदर्भ

संपादन
  • नॅशनल जिओस्पेशियल इंटेलिजेंस एजन्सी (एनजीआयए). प्रोस्टार सेलिंग दिशानिर्देश २००५जपान मार्गात . प्रोस्टार पब्लिकेशन्स (२००५).आयएसबीएन 1577856511ISBN १५७७८५६५११

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन