नवनीत राणा

भारतीय राजकारणी

नवनीत कौर राणा किंवा नवनीत रवी राणा (जन्मः ६ एप्रिल १९८५) ही एक माजी भारतीय अभिनेत्री आहे जिने मुख्यत्वे तेलुगू चित्रपटांत काम केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन भागीदार मित्रपक्षांच्या राजकीय पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या खासदार आहेत.[१][२][३][४][५]

नवनीत राणा

विद्यमान
पदग्रहण
१३ मे २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील आनंदराव विठोबा अडसूळ
मतदारसंघ अमरावती (लोकसभा मतदारसंघ)
बहुमत ३६,९५१

जन्म ६ एप्रिल, १९८५ (1985-04-06) (वय: ३८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२८ मार्च २०२४ पासून)
पती रवी राणा
व्यवसाय राजकारणी, अभिनेत्री

वैयक्तिक जीवन संपादन

नवनीत कौरचा जन्म आणि बालपण हे मुंबईतले. तिचे आई-वडील मूळचे पंजाबी आहेत. तिचे वडील सैन्यात अधिकारी होते. कार्तिका हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १२ वी नंतर तिने माॅडेलिंग करायला सुरुवात केली.[२] २०११ मध्ये रवी राणा आणि नवनीत कौर यांनी एका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये इतर साडेतीन हजार जोडप्यांसोबत लग्न केलं. अमरावतीचा हा सामुदायिक विवाह सोहळा रामदेव बाबांच्या संस्थेने आयोजित केला होता. या सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री नारायण राणे, सिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि 'सहारा'चे प्रमुख सुब्रतो रॉय हेही उपस्थित होते. राणा दाम्पत्याला तेव्हापासूनच प्रसिद्धी मिळू लागली आणि ते चर्चेत राहिले.[३]

चित्रपट कारकीर्द संपादन

नवनीत कौरने दर्शन या कन्नड चित्रपटातून तिच्या चित्रपटांत पदार्पण केले.[६] त्यानंतर सीनू वासंती लक्ष्मी (२००४) मधून तेलगूमध्ये पदार्पण केले. चेतना (२००५), जगपती (२००५), गुड बॉय (२००५), आणि भूमा (२००८) हे तिचे नंतरचे काही रिलीज आहेत. अतिरिक्त कामात कालचक्रम, टेरर, फ्लॅश न्यूझ आणि जबिलम्मा यांचा समावेश आहे जो तेलगूमधील चमेली या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. जेमिनी टीव्हीवरील हम्मा हुम्मा या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. रफी मेकार्टिन दिग्दर्शित लव्ह इन सिंगापूर या मल्याळम चित्रपटात तिने काम केले. २०१० मध्ये, तिने गुरप्रीत घुग्गी सोबत 'लड गया पेचा' या पंजाबी चित्रपटात काम केले.[७]

अभिनय संचिका संपादन

चित्रपट संपादन

वर्ष चित्रपट भूमिका भाषा
२००३ दर्शन नंदीनी कन्नड
२००३ सीनू वासंती लक्ष्मी लक्ष्मी तेलुगु
२००४ शत्रुवु - तेलुगु
२००५ चेतना: द एक्साइटमेंट आस्था हिंदी
२००५ जगपती - तेलुगु
२००५ गुड बाॅय कृष्णा वेणी तेलुगु
२००६ स्टाइल विशेष देखावा तेलुगु
२००६ रूममेट्स पल्लवी तेलुगु
२००६ रणम विशेष देखावा तेलुगु
२००७ महारथी - तेलुगु
२००७ यमडोंगा रंभा तेलुगु
२००७ बंगारू कोंडा आलेख्या तेलुगु
२००८ भूमा - तेलुगु
२००८ जबिलम्मा जबिलम्मा तेलुगु
२००८ टेरर - तेलुगु
२००८ अरसंगम आरती तमिळ
२००८ लव्ह इन सिंगापूर डायना परेरा मल्याळम
२००९ फ्लॅश न्युझ नक्षत्रा तेलुगु
२००९ एदुकोंडलवडा वेंकटरामणा अंदारू बागुंडली - तेलुगु
२०१० लड गया पेचा लव्हली पंजाबी
२०१० निर्णयम - तेलुगु
२०१० कालचक्रम - तेलुगु
२०१० अंबासमुद्रम अंबानी नंदीनी तमिळ
२०१० छेवन दरिया (द सिक्स्थ रिवर) रीत पंजाबी

संगीत चित्रफीत संपादन

वर्ष मुद्रिका गाणे गायक सहकलाकार
२००१ दिल का हाल सूने दिलवाला दिल का हाल सूने दिलवाला अल्ताफ राजा
२००२ दिल मेरा धडकन तेरी अंखियोमे अखिया डाल के अनुराधा पौडवाल आणि नितीन मुकेश अर्जान बाजवा
२००२ दिल मेरा धडकन तेरी इन नशीली आंखों से अनुराधा पौडवाल आणि नितीन मुकेश

राजकीय कारकीर्द संपादन

२०११ मध्ये रवी राणाबरोबर लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यावेळी रवी राणा हे अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. नवनीत राणा यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ति किटावर अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु या निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून ४ वेळा खासदार राहलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळांकडून नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला.[२] तिने पराभवाचे कारण सांगितले की तिची स्पर्धा अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याशी होती, ज्यांनी तत्कालीन विजयी उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी रॅली केली होती.

२०१९ मध्ये लोकसभेसाठी शिवसेना-भाजपा युती होती आणि आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते. यावेळी नवनीत राणा मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडून आल्या. या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला होता. अमरावतीतून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. २०१९ मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या. तिचा विजय हा विदर्भातील शिवसेनेच्या दुर्लक्षित बालेकिल्ल्यात अपक्ष उमेदवाराचा मोठा विजय मानला जात होता. हे निवडून आले तेव्हा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, पण निवडून आल्यानंतर मात्र त्यांचं राजकारण हे भाजपधार्जिणं राहिलेलं आहे.[२][३][४][५]

विविध स्तरांवर (म्हणजे स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय; सार्वजनिक किंवा लोकसभेसारख्या विविध संस्थांमध्ये) त्या वेळोवेळी शिवसेना आणि पक्षाच्या सदस्यांशी वाद घालताना दिसतात. खासदार झालेल्या नवनीत राणांचा शिवसेनेसोबत आणि अडसुळांसोबत संघर्ष मात्र २०१४ मध्येच सुरू झाला होता. २०१४ मध्ये राणा यांनी अडसूळांवर निवडणुकीदरम्यान विनयभंगाचा आरोप केला होता जो अडसूळांनी नाकारून लावला. नवनीत राणा नेहमी राजकीय पटलावर कोणत्यांकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.[३]

विवाद संपादन

२०१९ मध्ये पराभवानंतर अडसूळ यांनी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोप केला आणि ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानंही राणा यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि त्यांना दोन लाख रूपयाचा दंडही ठोठावला होता. राणा यांची खासदारकी धोक्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयात त्या गेल्या आणि तूर्तास दिलासा देत सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण अंतिम निकाल येईपर्यंत राणांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला होता आणि नवनीत राणा यांनी मोची (चर्मकार) जातीच प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढवली होती.[३][४]

एप्रिल २०२२ मध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांनी घोषणा केली होती. परंतु काही कारणाने हा निर्णय त्यांनी मागे घेतला. तरीही कौर आणि तिचा पती रवी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली; ज्यात देशद्रोह, दंगे भडकावने, शासकीय कामात अडथळा आणणे असे कलम लावण्यात आले होते. नंतर स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अपिलात गेल्यावर मुंबई न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन देखील मंजूर केला.[८]

हे देखील पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "दाक्षिणात्य अभिनेत्री ते खासदार; पाहा, थेट शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या नवनीत राणांची कारकीर्द".
  2. ^ a b c d Marathi, TV9 (2021-04-20). "Navneet Rana: कोण आहेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा?". TV9 Marathi. 2022-04-30 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e "रवी आणि नवनीत राणा: रामदेव बाबांच्या आश्रमापासून 'मातोश्री'पर्यंत".
  4. ^ a b c Marathi, TV9 (2022-04-23). "Navneet Rana | शिवसेनेविरोधात दोन हात करणाऱ्या कोण आहेत नवनीत राणा?मॉडलिंग ते राजकारणातील नवनीत यांचा प्रवास". TV9 Marathi. 2022-04-30 रोजी पाहिले.
  5. ^ a b तक, मुंबई. "Navneet Rana: शिवसेनेला कायमच नडलेल्या नवनीत राणा आहेत तरी कोण?". Mumbai Tak. Archived from the original on 2022-04-23. 2022-04-30 रोजी पाहिले.
  6. ^ "CineGoer.com - Interviews - Navneet Kaur". web.archive.org. 2012-05-28. Archived from the original on 2012-05-28. 2022-04-30 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  7. ^ "Navnit Ravi Rana". IMDb. 2022-04-30 रोजी पाहिले.
  8. ^ Bureau, ABP News (2022-04-24). "Hanuman Chalisa row: MP-MLA Couple Navneet Rana and Ravi Rana Granted Bail By Mumbai Court". ndtv.com (इंग्रजी भाषेत). 2024-03-28 रोजी पाहिले.