द्रविड मुन्नेत्र कळघम

भारतातील एक राजकीय पक्ष
(द्रविड मुन्नेट्र कळघम या पानावरून पुनर्निर्देशित)
द्रविड मुन्नेत्र कळघम
पक्षाध्यक्ष एम.के. स्टॅलिन
सचिव दुराई मुरुगन
लोकसभेमधील पक्षनेता ए.के.एस. विजयन
स्थापना सप्टेंबर, इ.स. १९४९
मुख्यालय अरिवालयम, अण्णा सालै,
चेन्नई - ६०००१८
युती संयुक्त पुरोगामी आघाडी (ऐक्किय मुर्पोक्कु कूट्टणी) (इ.स. २००४ पासून)
प्रकाशने 'मुरसोली'
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

द्रविड मुन्नेत्र कळघम् किंवा कळहम् किंवा द्रविड मुन्नेत्र कळघम (तमिळ: திராவிட முன்னேற்றக் கழகம் ; स्थानिक उच्चार: तिमुका , तिमुक; रोमन लिपी: Dravida Munnetra Kazhagam / Dravida Munnetra Katchi ; अर्थ: द्रविड विकास संघटना) हा तमिळनाडू, भारतातील एक राजकीय पक्ष आहे. पेरियार यांच्या द्रविडार कळगम् (इ.स. १९४४ सालापर्यंत जस्टिस् पार्टी म्हणून परिचित) या पक्षापासून फुटून सी.एन. अण्णादुरै याने इ.स. १९४९ साली हा द्रविडी पक्ष स्थापन झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अपवाद वगळता भारतातल्या एखाद्या राज्यातल्या विधिमंडळाच्या निवडणुका स्वबळावर जिंकून आपली राजवट स्थापण्याची विक्रमी कामगिरी करणारा तो पहिला राजकीय पक्ष आहे[].

संदर्भ

संपादन
  1. ^ चक्रबर्ती, बिद्युत. इंडियन पॉलिटिक्स ॲंड सोसायटी सिन्स इंडिपेंडन्स (स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय राजकारण व समाज) (इंग्लिश भाषेत). p. ११०-१११.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन