दो दूनी चार

२०१० चा हिंदी चित्रपट
Do Dooni Chaar (it); দো দুনি চার (bn); Do Dooni Chaar (fr); دوونى شار (فيلم 2010) (arz); ధో దూని చార్ (te); Do Dooni Chaar (nl); ದೋ ದೂನಿ ಚಾರ್ (kn); दो दूनी चार (hi); Do Dooni Chaar (cy); दो दूनी चार (mr); Do Dooni Chaar (en); دو دوتا چهارتا (fa); Do Dooni Chaar (de); दो दूनी चार (new) película de 2010 dirigida por Habib Faisal (es); pinicla de 2010 dirigía por Habib Faisal (ext); film sorti en 2010 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2010. aasta film, lavastanud Habib Faisal (et); película de 2010 dirixida por Habib Faisal (ast); pel·lícula de 2010 dirigida per Habib Faisal (ca); २०१० चा हिंदी चित्रपट (mr); Film von Habib Faisal (2010) (de); ୨୦୧୦ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 2010 film by Habib Faisal (en); cinta de 2010 dirichita por Habib Faisal (an); film út 2010 fan Habib Faisal (fy); film din 2010 regizat de Habib Faisal (ro); film från 2010 regisserad av Habib Faisal (sv); film del 2010 diretto da Habib Faisal (it); filme de 2010 dirigit per Habib Faisal (oc); film India oleh Habib Faisal (id); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); фільм 2010 року (uk); film uit 2010 van Habib Faisal (nl); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱒᱐᱑᱐ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); סרט משנת 2010 (he); filme de 2010 dirixido por Habib Faisal (gl); فيلم أنتج عام 2010 (ar); ffilm gomedi gan Habib Faisal a gyhoeddwyd yn 2010 (cy); filme de 2010 dirigido por Habib Faisal (pt) Two Times Equals Four (en)

दो दूनी चार हा २०१० सालचा हिंदी कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे जो अरिंदम चौधरी (प्लॅनमन मोशन पिक्चर्स) निर्मित आणि हबीब फैसल दिग्दर्शित व लिखीत आहे. यात ऋषी कपूर, नीतू सिंग, आदिती वासुदेव आणि आर्चीत कृष्णायांनी अभिनय केला असून मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका मध्यमवर्गीय शाळेतील शिक्षकाविषयी आहे जो महागाईच्या काळात पत्नी आणि मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि कार खरेदी करण्याच्या स्वप्नांमध्ये रमतो. त्याच्या याच एका कारच्या खरेदी भोवतीची ही कथा आहे. वाढत्या महागाईत आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागण्या पूरविण्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे ज्यात कमी वेतन असलेल्या मध्यमवर्गीय शालेय शिक्षकांच्या समस्यांचा मुद्दा उभारला आहे. या सिनेमात ऋषी कपूर आणि नीतू सिंग या कपूर दांप्ताने रुपेरी पडद्यावर मुख्य जोडी म्हणून पुनरागमन केले. या जोडीने ३० वर्षांमध्ये चित्रपटात भूमिका केली नसली तरी त्यांनी यापूर्वी १९७० च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. दिग्दर्शकीय पदार्पण करणारा चित्रपट डिस्ने वर्ल्ड सिनेमाद्वारे वितरित केलेला पहिला गैर-ॲनिमेटेड हिंदी चित्रपट देखील होता. ५८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला.[][][][]

दो दूनी चार 
२०१० चा हिंदी चित्रपट
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
  • comedy film
मूळ देश
संगीतकार
  • Meet Bros
निर्माता
  • Arindam Chaudhuri
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • Habib Faisal
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • ऑक्टोबर ८, इ.स. २०१० (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)
कालावधी
  • ११० min
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

निर्माण

संपादन

चित्रपटाच्या कथालेखनाच्या वेळी देखिल ऋषी कपूर निर्मात्यांच्या मनात होते. ऋषी कपूरच्या विरुद्ध महिला कलाकारासाठी सुरुवातीला जूही चावलाकडे संपर्क साधला गेला होता, तथापि, तिने ही भूमिका नाकारली.[] नीतू-ऋषीच्या जोडीने सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणच्या २००९ सालच्या लव आज कल या सिनेमातून थोडक्यात हजेरी लावली असली तरी, दो दूनी चार हा या जोडीचा ३० वर्षानंतरचा पहिला चित्रपट होता. १९७९ मध्ये ऋषी कपूरसोबत तिच्या विवाहानंतर नीतू सिंग यांनी चित्रपटातून निवृत्ती घेतली होती. एका मुलाखतीत नीतूने हा खुलासा केला की तिचा या चित्रपटात काम करण्याचा कोणताही हेतू नव्हता; पण तिच्या पतीच्या आग्रहास्तव तिने संहिता ऐकण्याची तयारी दर्शविली आणि मग होकार पण दिला.[]

किरोरी माल कॉलेज, विनोबापुरी, शालीमार बाग, खान मार्केट, चित्तरंजन पार्क, मयूर विहार फेज ३ आणि नोएडा यासारख्या दिल्लीतील ठिकाणांवर चित्रीकरण झाले आहे.[]

मीत ब्रदर्सने या चित्रपटाचे संगीत देले असून शंकर महादेवन, विशाल ददलानी, सुनिधी चौहान यांनी गाणी गायली आहेत.

पुरस्कार

संपादन

५८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार बहाल करण्यात आला.[] तसेच, त्यास चार फिल्मफेअर पुरस्कार[] आणि एक स्टार स्क्रीन पुरस्कारही मिळाले.[१०]

संदर्भ

संपादन
  1. ^ Bhushan, Nyay. "New York Indian Film Festival to Open with Walt Disney India's First Live-Action Hindi Film". The Hollywood Reporter. 2011-04-04 रोजी पाहिले.
  2. ^ "How small films made it big? - Film Festivals & Markets". BollywoodTrade.com. 26 March 2011. 2011-04-04 रोजी पाहिले.
  3. ^ "New York Indian Film Festival to Open with Walt Disney's Film". Pravasi Herald. 9 March 2011. 2011-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Disney India to release 'Do Dooni Char' Oct 8". Yahoo! Movies. 19 ऑगस्ट 2010. 23 August 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "Script is vital says 'Do Dooni Chaar' producer -". द टाइम्स ऑफ इंडिया. 6 Oct 2010. 23 November 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Do Dooni Chaar script brought me back to films: Neetu Singh". Money Control. 23 Oct 2010.
  7. ^ "Do Dooni Chaar". Bollywood Hungama.
  8. ^ "58th National Film Awards: Rishi Kapoor, Arbaaz Khan on cloud nine after bagging national award". द इकोनॉमिक टाइम्स. 20 May 2011. 2011-07-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. ^ "Winners of 56th Filmfare Awards 2011". Bollywood Hungama. 5 मार्च 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 मार्च 2011 रोजी पाहिले.
  10. ^ "Winners of 17th Annual Star Screen Awards 2011". Bollywood Hungama. 9 जानेवारी 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 जानेवारी 2011 रोजी पाहिले.