प्राचीन परंपरेत देहदान ही संकल्पना प्रचलित नाही त्यामुळे ती शास्त्र दृष्ट्या संमत नाही असे मानले जाते. दाहकर्म संस्कारात देहामध्ये काही अपूर्णता असेल तर दिवंगताला सद्गती मिळत नाही अशी समजूत प्रचलित आहे, त्यामुळे देहदान करण्यास लोक उत्सुक दिसत नाहीत. तथापि गीतेत कृष्णाने सांगितले आहे की प्रत्येक माणूस त्याच्या जीवंतपणी जी कृत्ये करतो त्यानुसार त्याला पुढील गती प्राप्त होते.रक्तदान, नेत्रदान, अवयवदान  ही विसाव्या शतकातील अत्यात  पुण्यकारक दाने होत.या दानांमुळे कोणाला दृष्टी मिळते तर कोणा अत्यावस्थास जीवनदान मिळते. अशा प्रकारचे दान करण्याची सोय आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे झाली आहे. नरदेहाच्या सूक्ष्म अभ्यासासाठी उपयोगी ठरते देहदान!

देहदान केल्यानंतर श्राद्धविधीही अवश्य करावा. श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् | जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय, त्यामुळे निधन पावलेल्या व्यक्तीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देहदान केले असले तरी श्राद्ध अवश्य करावे.

राजा हर्षवर्धन आपली संपत्ती गरजूना देत असे. राजा दिलीपाने आपला देहच सिंहाच्या भुकेसाठी दिला होता. शिबी राजाने कबुतराच्या प्राणासाठी आपला देह देवू केला. अशी आपली प्राचीन दानपरंपरा.या परंपरेत विनोबांनी भूदान, श्रमदान याची भर घालून कालोचित दान प्रकारांची ग्वाहीच दिली आहे.

संदर्भ व नोंदी

संपादन
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.