देबानंद अमत (१६ जानेवारी १९१६ - २१ डिसेंबर २०११) हे भारतीय राजकारणी होते. ते १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून, १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून ओरिसातील सुंदरगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.