दिलीप संघवी (१ ऑक्टोबर, १९५५:अमरेली, गुजरात, भारत - ) हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी सन फार्मास्युटिकल्स कंपनीची स्थापना केली आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. इंडिया टुडे नियतकालिकाने त्यांना २०१७ मध्ये भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांचा यादीत ८ वे स्थान दिले होते.

सुरुवातीचे जीवनसंपादन करा

दिलीप संघवी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ मध्ये गुजरात मधील अमरेली छोट्या शहरात झाला. त्यांचा वडिलांचे नाव शांतिलाल सांघवी आणि आईचे नाव कुमुद सांघवी आहे. त्यांचा वडिलांचा औषधांचा व्यवसाय होता, त्यामध्ये ते त्यांचा जवळील दुकानदारांना औषधे पुरवित असे. दिलीप संघवी यांनी जे. जे. अजमेरा हायस्कूल आणि भवानीपूर एजुकेशन सोसायटी कॉलेज येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, तर कलकत्ता युनिव्हर्सिटी मधून वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली.