दरेगाव हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. दरेगाव हे गाव डोंगराळ भागात वसलेले आहे, ह्या गावाच्या चारही बाजुस डोंगरी प्रदेश आहे. ह्या गावाची प्रमुख व मुख्य भाषा अहिराणी (मराठी) ही आहे. गावाच्या पश्चिमेस या गावाच्या आराध्या देवी भवानी मातेचं मंदिर आहे. या मंदिराजवळील प्रदेश खुप सुंदर आहे. तिथेच भवनदारा या नावाचे छोटेसे धरण आहे. कदाचित भवानी देवीच्या नावावरून या धरणाचे नाव ठेवण्यात आले असावे.