थोरला धोबी या पक्ष्याला मराठीत परिट, मामुला, मोडवोण, कवड्या धोबी असेही म्हटले जाते.

White-browed Wagtail (Motacilla maderaspatensis) carrying feed for the chicks W IMG 2622
White-browed Wagtail (Motacilla maderaspatensis)

इंग्रजी नाव संपादन

Large Pied Wagtail (लार्ज पाईड वॅगटेल)

शास्त्रीय नाव संपादन

Motacilla maderaspatensis (मोटॅसिला मॅडरॅस्पटेन्सिस)

आकार संपादन

२१ सेंमी

माहिती संपादन

हा पक्षी ओढ्यानाल्याच्या काठाने, तलाव, डबकी अशा पाणथळ ठिकाणी दिसतो. याला कारण म्हणजे त्याचा आहार. किडे, चतुर, टोळ, नाकतोडे टिपताना त्याची शेपटी सारखी खालीवर होत राहते. बहुदा एक एकटे किंवा जोडीने दिवसभर फिरणारे धोबी रात्री एकत्र येऊन वस्ती करतात. एखाद्या नदीच्या पात्रातल्या मोक्याच्या खडकावर धोबी धुणं धूत असतो आणि जवळच पक्ष्यांमधला धोबी त्याची शेपूट धोब्याच्या धोपाटण्यासारखी खालीवर करत असतो. साधारण बुलबुलएवढा धोबी वर्षभर आपल्याकडे दिसतो.राखी किंवा करडा धोबी, पिवळसर धोबी, काळा-पांढरा धोबी या धोब्यांच्या इतर जाती स्थानिक अथवा हिवाळी स्थलांतर करून आपल्याकडे येतात. थोरला धोबी पाण्याचे साठे, तलाव, नद्या, ओढे आणि पाणथळींवर दिसतो. एकटा किंवा दुकटा. हा पक्षी बगळ्यांसारखा थव्यांनी राहत नाही. थोरला धोबी मार्च ते सप्टेंबर या काळात घरटं करतो. नदीच्या पात्रातल्या खडकावर पानवनस्पतींच्या आधारानं, एखाद्या घराच्या गच्चीमध्ये असणाऱ्या अडगळीत किंवा पुलाच्या तूळईच्या खाली धोब्याचं वाटीसारखं घरटं सापडतं. घरट्यासाठी मुळ्या, केस, लोकर, चिंध्या, सुतळी, दोऱ्या, सुकलेलं शेवाळ असं समान वापरलं जातं. घरटं पाण्यापासून फार दूर केलं जात नाही. थोरला धोबी आणि तारवाली यांची घरटी जवळ जवळ असतात असं काही पक्षी निरीक्षकांच निरीक्षण आहे. तुम्ही मुलं वार्षिक परीक्षेच्या तयारीत दंग असताना नदीवर असणारा काळा-पांढरा धोबी त्याच्या घरट्याची तयारी सुरू करतो. नदीच्या आसपास असणाऱ्या घराच्या गच्चीत बरेच दिवस पडून राहिलेल्या सामानाच्या अडगळीत या पक्ष्याला घरटं करण्यासाठी सुरक्षित जागा सापडते. सिमेंटच्या रिकाम्या पोत्याखाली, विटांच्या ढिगात, गंजक्या पिंपात, लाकडी फळीच्या खाली, इतकच नाही, तर पाण्याच्या टाकीच्या झाकणाखाली मला धोब्याची घरटी सापडली आहेत. ससाण्यांकडून नजर घ्या. तुम्हालाही धोब्याची घरटी सापडतील. घरटी शोधत असताना किंवा सापडल्यावर धोब्याला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, उगीचच त्याच्या घरट्याच्या जवळ जायचं नाही, त्याला दचकवायचं नाही हे लक्षात ठेवायचं बरं का! आता तुम्ही विचाराल कि आमच्या घराच्या गच्चीत धोब्याचं घरटं आहे हे आम्ही ओळखायचं तरी कसं? त्यासाठी टी.व्ही.च्या ॲंटेनाकाडे लक्ष ठेवा. आता जवळजवळ प्रत्येक घरावर गुढी उभारल्यासारखे ॲंटेणा दिसत आहे. या ॲंटेनांच्या दांड्या म्हणजे धोब्याची आवडती जागा. अशाच एखाद्या दांडीवर बसून हा धोबी सकाळी आनंदी सुरांची बरसात करतो. एवढ्या साध्या निरीक्षणाचा धागा हातात आला, कि त्याच्या आधारानं तुम्हाला धोब्याच्या घरट्यापर्यंत पोहोचता येतं. त्याचं घरटं शोधण्यात किती आनंद आहे हे प्रत्यक्ष्य अनुभवल्याशिवाय कळणार नाही.

संदर्भ संपादन

दोस्ती करूया पक्ष्यांशी:श्री.किरण पुरंदरे