थ्युरिंगेन

(थुरिंजिया या पानावरून पुनर्निर्देशित)

थ्युरिंगेन (जर्मन: Freistaat Thüringen; इंग्लिश नाव: थ्युरिंजिया) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या मध्य भागात वसलेल्या थ्युरिंगेनच्या भोवताली जाक्सन, नीडरजाक्सन, जाक्सन-आनहाल्ट, बायर्नहेसे ही राज्ये आहेत. १६,१७२ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे २२ लाख लोकवस्ती असलेले थ्युरिंगेन जर्मनीमधील आकाराने ११व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १२व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. एरफुर्ट ही थ्युरिंगेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. वाईमार हे ऐतिहासिक शहर ह्याच राज्यात स्थित आहे.

थ्युरिंगेनचे स्वतंत्र राज्य
Freistaat Thüringen
जर्मनीचे राज्य
ध्वज
चिन्ह

थ्युरिंगेनचे स्वतंत्र राज्यचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
थ्युरिंगेनचे स्वतंत्र राज्यचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी एरफुर्ट
क्षेत्रफळ १६,१७२.५ चौ. किमी (६,२४४.२ चौ. मैल)
लोकसंख्या २२,१४,०००
घनता १३७ /चौ. किमी (३५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-TH
संकेतस्थळ http://www.thueringen.de

थ्युरिंगेनचा मोठा भाग घनदाट जंगलाने व्यापला असून हे नैसर्गिक व हिवाळी खेळांचे जर्मनीमधील सर्वात मोठे स्थळ आहे.

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर हे राज्य पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. १९५२ साली पूर्व जर्मनीने राज्ये बरखास्त करून जिल्ह्यांची निर्मिती केली व थ्युरिंगेन राज्य तीन जिल्ह्यंमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणापूर्वी सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये थ्युरिंगेनला परत राज्याचा दर्जा मिळाला.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: