तीस्ता सेटलवाड
तीस्ता सेटलवाड यांचा जन्म ९ फेब्रुवारी, १९६२ साली मुंबई येथे झाला. १९६२ साली गुजराती हिंदू कुटुंबात जन्मलेल्या मुंबईस्थित वकील अतुल सेटलवाड आणि पत्नी सीता सेटलवाड यांची कन्या तीस्ता सेटलवाड. तीस्ता सेटलवाड यांचे आजोबा हे भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल होते. भारतीय नागरी हक्क कार्यकर्ती आणि पत्रकार. २००२ मध्ये गुजरातमधील जातीय हिंसेच्या पीडितांना न्याय देण्यासाठी लढा देणाऱ्या या संस्थेची स्थापना सिटीझन्स फॉर जस्टीस अँड पीस (सिजेपी) या संस्थेच्या सचिव आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाने त्यांचे व्यक्तीमत्व वादग्रस्त आहे.
तीस्ता सेटलवाड | |
---|---|
वडील | अतुल सेटलवाड |
आई | सीता सेटलवाड |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
शिक्षण
संपादनतीस्ता सेटलवाड यांनी २ वर्षे कायद्याचे शिक्षण घेतले. १९८३ मध्ये मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञानशास्त्राची पदवी प्राप्त करून आणि पत्रकार म्हणून काम सुरू केले.
कामाचा विषय
संपादनतीस्ता सेटलवाड एलफिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांचा वेगवेगळ्या विद्यार्थी चळवळींशी संपर्क आला. त्या काळात संपूर्ण देशात आणीबाणीचं वातावरण होत. सर्वसामान्य लोकांच्या असंतोषाचा अविष्कार देशभर होत होता. यातच तीस्ता यांच्या राजकीय आणि सामाजिक जाणिवा जागृत होत होत्या. आपण पत्रकारिता करायची ती केवळ पैसे मिळवण्यासाठी किंवा कारकीर्द म्हणून नाही तर लोकांसाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी करायच हे मनात ठरत होत. बी. ए.ची पदवी मिळाल्यावर लगेचच तीस्ता यांना ‘द डेली’ या दैनिकात बातमीदाराची नोकरी मिळाली. मुख्य धारेतील पत्रकारितेच्या आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत तीस्तांनी ‘डेली’च्या बरोबरीनं ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘बिझनेस इंडिया’ सारख्या मोठ्या प्रकाशनांमध्येही काम केलं. सुरुवातीला फक्त बातमीदार, मग विशेष प्रतिनिधी आणि नंतर ज्येष्ठ प्रतिनिधी अशा चढत्या पदांवर काम करताना मंत्रालय, महापालिका, शिक्षण, ग्रामीण, कामगार अशा अनेक बिट्सवरचा भरपूर अनुभव त्यांनी मिळवला. गर्भ लिंगपरीक्षा विरोधी कायदा महाराष्ट्रात मंजूर व्हावा म्हणून त्यांनी आपल्या लेखणीचा वापर करतानाच प्रत्यक्ष महिला आंदोलनामध्येही भाग घेतला. पुढे १९८८ मध्ये शासनाने तो कायदा करेपर्यंत तीस्ता यांनी या विषयाचा पिच्छा सोडला नाही. देशभर गाजलेलं राजस्थान सती प्रकरण झालं तेव्हा तीस्ता यांनी राजस्थानात प्रत्यक्ष दौरे करून ‘बिझनेस इंडिया’ मधून लिहिलेली वार्तापत्र लक्ष्यवेधी ठरली. अशाप्रकारे लोकांचे एक-एक प्रश्न घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करतच पत्रकारिता करण्याची पद्धत त्यांनी अनुसरली होती. ज्या दैनिकात आपण काम करतो त्या माध्यमाची शक्ती सर्वसामान्य लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांसाठी वापरण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न चालू होता.
कामातील अनुभव
संपादन१९९२-९३ साली मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतातील काही हिंदू संघटनांनी अयोध्येची बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईत दंगलींची सुरुवात झाली. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातली धर्मांध मंडळी रस्त्यावर उतरली आणि खुलेआम कत्तल सुरू झाली. जाळणे, कापणे, फोडणे, तोडणे अशा विध्वंसक कृतींनी मुंबईत थैमान घातलं. या परिस्थितीत तीस्ता या वॉर रिपोर्टर प्रमाणे काम करत होत्या. शक्य तेवढ्या घटनास्थळी हजर राहून तीव्र पण संयमित शब्दांत वर्ताकरण करत होत्या. दंगल रोखण्यासाठी तैनात केलेले पोलिसच समाजविरोधी कृत्यात सामील झाले आहेत असा आरोप त्या करत. एखाद्या ठिकाणी अत्याचार होत असतील तर त्यांच्या मदतीला न जाणं असे प्रकार चालू होते. शिवाय आपण हे करताना काही गैर करतो आहोत असं पोलिसांना वाटत नव्हतं. त्यामुळे धडधडीतपणे वायरलेस वरून ते मोठ्यांदा चर्चा करत होते. तीस्ता यांना राहवलं नाही. हा प्रकार लोकांसमोर आणलाच पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी हॅम रेडीओच्या मदतीनं पोलिसांचं वायरलेसवरचं जास्तीत जास्त संभाषण टेप केलं आणि एकत्रितपणे सर्व पुरावा घेऊन ते जगापुढे आणलं. शासन, प्रशासन, सामाजिक संघटना, माध्यमं अशा सगळ्यांनाच तो एक मोठा धक्का होता. न्यू यॉर्क टाइम्ससारख्या आंतराष्ट्रीय दैनिकानं आणि बीबीसी, सि.एन.एन. सारख्या वाहिन्यांनीही यावर भरपूर खल केला. त्याकाळी म्हणजे भारतात खाजगी वृत्तवाहिन्या सुरू होण्याच्या खूप आधी सी.एन.एन. वर तीस्ता यांची सविस्तर मुलाखत झाली. जमातवाद या विषयावर व्याख्यानं देण्यासाठी पूर्वीपासून तीस्ता पोलीस ॲकॅडमीत जात होत्या. पण या घटनेनंतर अधिक सन्मानानं त्यांना तिथं बोलावलं गेलं. कामाची निवड/ आवड:- तीस्ता यांच्या मते धर्मांध शक्तींचा धोका इतका वाढतो आहे की, त्याचा ताकदीनिशी मुकाबला होण्याची गरज आहे. पण म्हणून केवळ परिस्थितीच्या नावानं बोटं मोडत बसणं हा त्यावर उपाय नाही. एकीकडे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारी माध्यमं आणि दुसरीकडे धर्मांध शक्तींची अविरत चालणारी प्रकाशानं या दोन्हींवर पर्याय म्हणून धर्मनिरपेक्ष शक्तींचं एक मसिक काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. केवळ ५ हजार रुपये असताना त्या आणि त्यांचे पती जावेद आनंद (तेही पत्रकार आहेत.) यांनी मिळून कम्युनॅलिझम कॉम्बॅट हे इंग्रजी मासिक त्याच वर्षी म्हणजे १९९३ साली सुरू केलं. तीस्ता आणि जावेद यांनी जेव्हा हे मसिक सुरू केलं तेव्हा त्याला अक्षरशः आपलं तन, मन, धन अर्पण केलं. मुंबईतल्या बड्या इंग्रजी दैनिकात पत्रकारांना दरमहा लाखो रुपये पगार मिळतो ही आता जगजाहीर गोष्ट आहे. तेव्हा अशा संधीवर पाणी सोडून ते दोघंही एका विचारला वाहिलेल्या मासिकाची खडतर वाट चालू लागले. तीस्ता यांचा भारातीय लोकशाहीवर विश्वास नाही.
तीस्ता याचं लोकशाहीवरील मत
संपादन“आपण जरी जगातली फार मोठी लोकशाही आहोत असं स्वतःच म्हणवून घेत असलो तरी प्रत्यक्षात लोकशाही आहे कुठ ? सर्वसामान्य मतदार मत देतो आणि त्यातूनच इथली सरकारं बनतात यात शंकाच नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा, मंत्रिमंडळ असा जो इथला मनोरा आहे त्यामध्ये या सामान्य माणसाला काय स्थान आहे?” “विधानसभेत किंवा लोकसभेत जे निर्णय होतात ते सामान्य माणसाच्या इच्छेनं होतात का? त्याच्या हिताचे होतात का ? मग कुठली आलीय लोकशाही ? आणि नसलेल्या लोकशाहीचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे ?” त्या म्हणतात कि, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही मुल्य मानणारे पक्ष आणि संघटना सध्या काय ‘नको’ यावरच भर देत आहेत. म्हणजे मोठी धरणं नको, जागतिकीकरण नको, ढोंगी लोकशाही नको वगैरे. हे सगळं मान्यच आहे पण आता काय ‘हवं’ हे सांगायची वेळ आली आहे. नवी व्हिजन, नवी स्वप्नं, नवी दिशा लोकांपुढे मांडली पाहिजे. ‘असं’ जग हवं आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. एक-एक प्रश्न घेऊन लढणा-यांनी एकदा शांतपणे एकत्र बसलं पाहिजे. काय हवं याची यादी करण्यासाठी नवा विचार केला पाहिजे. अर्थात इतरांवर टीका करताना त्या स्वतःलाही त्यातून वागळत नाही. थोडक्यात, सर्वसामान्य माणसांचं जगणं, त्यांच्या व्यथावेदना, त्यांचं भवितव्य हाच तीस्ता यांचा श्वास आहे. रस्त्यावर उतरून करायची आंदोलनं, न्याय हक्कांसाठी कोर्टकचे-या, माध्यमांमधून आवाज उठवणं, स्वतःचं मासिक, स्वयंसेवी संस्था सर्व आघाड्यांवर त्या लढत आहेत.
भ्रष्टाचार
संपादनतीस्ता सेटलवाड यांनी केंद्र सरकारचे १.१४ कोटी रुपये सबरंग या स्ंस्थे मार्फत खाल्याचा आरोप त्यांचे निकटचे सहकारी रईस खान पठाण यांनी केला.[१] शिक्षणासाठी मिळालेले पैसे सामाजिक सलोखा बिघडवण्यास वापरला असा आरोपही यामध्ये आहे. यामुळे १.१४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा अहमदाबाद येथे दाखल केला गेला आहे.[२][३] गुलबाग सोसायटी मधील रहीवासी तीस्ता सेटलवाड यांनी स्मरणिकेसाठी मिळालेल्या पैशांचा अपहार केला असे दावा करतात.[४] तीस्ता सेटलवाड यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआय ने त्यांच्या कार्यालयावर सन २०१५ मध्ये छापे घातले. Foreign Contributions Regulation Act या कायद्याचे उल्लघन करून त्यांनी फोर्ड फाउंडेशन कडून सुमारे दोन लाख नव्वद हजार डॉलर्स घेतले असा आरोप निश्चित केला.[४] सरकारी कामात अडथळे आणने, खटल्यात खोटी साक्ष देणे, पुराव्वे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर आहेत.[४][५]
पुरस्कार
संपादन- पियूसीएल जर्नलिझम फॉर ह्यूमन राइट्स अवार्ड १९९३.
- थोर स्त्री पत्रकारांसाठी १९३९चा चमेली देवी जैन पुरस्कार.
- १९९९ मध्ये महाराणा मेवाड फाउंडेशनचा हाकिम खान सूर पुरस्कार.
- २००० मध्ये दलित लिबरेशन एज्युकेशन ट्रस्टचा मानवी हक्क पुरस्कार.
- २००२ साली राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार. (संयुक्तपणे हर्ष मंडेर यांच्यासह) काँग्रेस पक्षाकडू दरवर्षी राष्ट्रीय सदिच्छा प्रसारित करणा-या लोकांना दिला जातो.
- २००३ मध्ये नुरीमबर्ग आंतरराष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार.
- २००४ मध्ये डिफेन्डर ऑफ डेमोक्रसी पुरस्कार (हेलन क्लार्क सह संयुक्तपणे), ग्लोबल ॲक्शनच्या सदस्यांनी दिलेल्या २००४ एम.ए. थॉमस नॅशनल ह्युमन राईट्स ॲवॉर्ड फॉर विजील इंडिया मुवमेंट.
- २००६ मध्ये नानी ए पालखीवाला पुरस्कार टाटा समूहाद्वारे, ट्रस्टद्वारे देण्यात आला.
- २००७ मध्ये मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार[६]
- पद्मश्री २००७ मध्ये, भारत सरकारच्या सार्वजनिक कार्यासाठी देण्यात आला.
- २००९ एफआयएमए एक्सलन्स अवार्ड- फेडरेशन ऑफ इंडियन मुस्लिम असोसिएशन ऑफ कुवेत पक्स क्रिस्टी इंटरनॅशनल पीस पुरस्कार (संयुक्तपणे ऑस्ट्रेलियन कलाकार एडी नेबेनसह), इव्हॅंजेलिकल ग्रुप पक्स क्रिस्टी यांनी दिला.
संदर्भ
संपादनपुस्तकः-खरे खुरे आयडॉल्स
- ^ "Teesta Setalvad Not To Be Arrested Till May 2: Bombay High Court Tells Gujarat Police". NDTV.com. 2018-07-28 रोजी पाहिले.
- ^ "Teesta Setalvad booked for securing central aid fraudulently for her NGO". The Economic Times. 2018-04-01. 2018-07-28 रोजी पाहिले.
- ^ "Teesta Setalvad, Husband Questioned By Gujarat Police In Alleged NGO Fund Misapropriation Case". https://www.outlookindia.com/. 2018-07-28 रोजी पाहिले. External link in
|work=
(सहाय्य) - ^ a b c "Teesta Setalvad: Heroine Or Hypocrite?". HuffPost India (इंग्रजी भाषेत). 2016-07-18. 2018-07-28 रोजी पाहिले.
- ^ "SC paves way for probe against Teesta Setalvad, others". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-12-06. 2018-07-28 रोजी पाहिले.
- ^ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmanthan-epaper-lokmanth/pra+aashalata+kambale+yanna+bhimabai+aambedakar+puraskar-newsid-76027640?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa