Disambig-dark.svg

तरूण भारत हे महाराष्ट्रातील अनेक शहरांतून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड कंपनीमार्फत प्रकाशित केले जाते. नागपूर येथे याचे मुख्यालय असून अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, अकोला, खामगाव, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, पुणेमुंबई या शहरांतून प्रसिद्ध होते.

इतिहाससंपादन करा

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षांतर्गत सक्रिय असलेल्या स्वराज्य पक्षाच्या बॅरिस्टर अभ्यंकर, दादासाहेब उधोजी यांनी अमर पुराणिक यांच्या पुढाकाराने २० जानेवारी, इ.स. १९२६ रोजी हे तरुण भारत नावाचे वृत्तपत्र प्रकाशित करायला सुरुवात केली.[१]. हे वृत्तपत्र आरंभी साप्ताहिक स्वरूपाचे, अर्थात आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे, होते. ना.भा. खरे याचे संस्थापक-संपादक होते. इ.स. १९३०च्या दशकातील असहकार आंदोलनादरम्यान ब्रिटिश भारतीय शासनाकडून या वृत्तपत्राशी संबंधित लोकांची धरपकड झाल्याने साप्ताहिक बंद पडले. बॅरिस्टर अभ्यंकरांच्या मृत्यूनंतर २ जानेवारी, इ.स. १९४४ रोजी अभ्यंकरांच्या ९व्या स्मृतिदिनी वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले[१]. या पुनरुज्जीवित वृत्तपत्राच्या संपादकत्वाची सूत्रे गजानन त्र्यंबक माडखोलकरांनी स्वीकारली.

पुणे आवृत्तीसंपादन करा

२० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी गजानन विश्वनाथ केतकर यांची नियुक्ती करण्यात आली.

पुण्याच्या ‘तरुण भारत’च्या आवृत्तीचे पहिले संपादक ग.वि. केतकर यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. पण गांधीहत्येच्या संदर्भात केतकरांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर सरकारी रोष ओढवला. त्यामुळे त्यांनी संपादकपद सोडले.

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. a b "तरुण भारत - "आमच्याबद्दल" : तरुण भारत वृत्तपत्राचा इतिहास". २४ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


हेही पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.