ड्युरेक्स (निरोध)
ड्युरेक्स हा एक कंडोम आणि वैयक्तिक वंगणांचा ब्रँड आहे, ज्याची मालकी रेकिट बेंकिसर या कंपनीकडे आहे. ही कंपनी सुरुवातीला लंडनमधील लंडन रबर कंपनी आणि ब्रिटिश लेटेक्स प्रोडक्ट्स लिमिटेडच्या अखत्यारीत विकसित करण्यात आली, जिथे १९३२ आणि १९९४ दरम्यान कंडोम तयार केले गेले.
ड्युरेक्स कंडोम्स | |
स्थानिक नाव | ड्युरेक्स |
---|---|
प्रकार | कंडोम आणि लैंगिक खेळणी |
उद्योग क्षेत्र |
|
स्थापना | १९१५ |
संस्थापक | एस एस एल इंटरनशनल |
मुख्यालय | ब्रिटन |
उत्पादने |
|
लंडन रबर कंपनीची स्थापना १९१५ मध्ये झाली आणि ड्युरेक्स ब्रँड नाव ("टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि उत्कृष्टता") १९२९ मध्ये सुरू करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात लंडन रबरने रबर तंत्रज्ञानाच्या एका विद्यार्थ्याच्या सहकार्याने १९३२ पर्यंत स्वतःच्या ब्रँड कंडोमचे उत्पादन सुरू केले. हा विद्यार्थी पोलंडचा लुसियन लँडौ हा होता.
जेसिका बोर्गे यांनी लिहिलेले द लंडन रबर कंपनी आणि ड्युरेक्स कंडोमच्या इतिहासावरील पहिले पुस्तक मॅकगिल-क्वीन युनिव्हर्सिटी प्रेसने सप्टेंबर २०२० मध्ये प्रकाशित केले.
२००७ मध्ये यूकेमध्ये ड्युरेक्स कंडोम बनवणाऱ्या शेवटच्या कारखान्याने उत्पादन बंद केले आणि त्यानंतर कंपनीने उत्पादन चीन, भारत आणि थायलंडमध्ये सुरू केले.[१] या कंपनीच्या आधुनिक श्रेणींमध्ये उत्तर अमेरिकेतील शेख आणि रॅमसेस ब्रँड आणि अवंती कंडोमसह विविध प्रकारच्या लेटेक्स कंडोमचा समावेश आहे. ड्युरेक्स वंगण आणि लैंगिक खेळणीदेखील प्रदान करते.
ड्युरेक्स ही कंपनी ऑलिम्पिक खेळांची अधिकृत प्रायोजक नसली तरी, ड्युरेक्सने लंडनमधील २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेल्या १०,०००हून अधिक खेळाडूंना १,५०,००० मोफत कंडोम दिले.[२]
उत्पादने
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "New chapter in the 81-year history of Durex" (इंग्रजी भाषेत). 2010-07-21.
- ^ "Bloomberg - Are you a robot?". www.bloomberg.com. 2022-02-02 रोजी पाहिले.