डोव्हरची सामुद्रधुनी

डोव्हरची सामुद्रधुनी (इंग्लिश: Strait of Dover; फ्रेंच: Pas de Calais) ही इंग्लिश खाडीच्या सर्वात अरूंद भागातील एक सामुद्रधुनी आहे. इंग्लंडच्या केंट काउंटीमधील डोव्हरफ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील कॅले ही दोन गावे डोव्हरच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर केवळ ३४ किमी अंतरावर वसलेली आहेत.

डोव्हरच्या सामुद्रधुनीचे स्थान
फ्रान्समधून डोव्हरच्या सामुद्रधुनीपलीकडील इंग्लंडच्या किनाऱ्याचे दृष्य

डोव्हरची सामुद्रधुनी हा सागरी वाहातुकीसाठी जगातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.