डॅनिश वसाहती साम्राज्य
डॅनिश वसाहती साम्राज्याची सुरुवात १३व्या शतकात झाली, जेंव्हा डेन्मार्कने एस्टोनियात प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. १५३६ साली डेन्मार्क व नॉर्वेचे एकत्रीकरण झाले, यानंतर डेन्मार्क-नॉर्वे या नव्या देशाने फेरो द्वीपसमूह, आइसलॅंड व ग्रीनलॅंड जिंकले. आपल्या शिखरावर डेन्मार्कच्या वसाहती युरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि आशियात पसरल्या होत्या. 1814 साली नॉर्वे स्वीडनला आंदण देण्यात आले (नेपोलियोनिक युद्धे). यामुळे वसाहती डेन्मार्कच्या हातात गेल्या.