ट्रेंट ब्रिज मैदान (नॉटिंगहॅम)

(ट्रेंट ब्रीज या पानावरून पुनर्निर्देशित)

ट्रेंट ब्रिज नॉटिंगहॅम शहरामधील ट्रेंट नदी पलिकडील क्रिकेट मैदान आहे, जे बहुतेक वेळा कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि वेस्ट ब्रिजफोर्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड स्थित काउंटी क्रिकेटसाठी वापरले जाते. ट्रेंट ब्रिज हे नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्यालय देखील आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नॉटिंघमशायरच्या होम गेम्ससह ह्या मैदानावर ट्वेंटी२० चषकाचे दोन अंतिम सामने आयोजित झाले आहेत.
२००९ मध्ये आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० साठी मैदान वापरण्यात आले, त्यावेळी दक्षिण आफ्रिकापाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीचे आयोजन येथे केले गेले. मैदानाचे नाव ट्रेंट नदीवर जवळच असलेल्या मुख्य पुलावरून घेतले गेले आहे. हे मैदान मिडो लेन आणि सिटी ग्राउंड जवळ आहे, जो अनुक्रमे नॉट्स काउंटी आणि नॉटिंगहॅम फॉरेस्टचे फुटबॉल मैदान आहे.

ट्रेंट ब्रिज
मैदान माहिती
स्थान नॉटिंगहॅम, इंग्लंड
स्थापना १८३०
आसनक्षमता १७,५००
यजमान नॉट्टींघमशायर

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १-३ जून १८९९:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा. १८-२२ ऑगस्ट २०१८:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  वि. भारतचा ध्वज भारत
प्रथम ए.सा. ३१ ऑगस्ट १९७४:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
अंतिम ए.सा. ६ जून २०१९:
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२० ६ जून २००९:
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वि. भारतचा ध्वज भारत
अंतिम २०-२० २४ जून २०१२:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
यजमान संघ माहिती
नॉट्टींघमशायर (१८४० – सद्य)
शेवटचा बदल १३ जून २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

इतिहास

संपादन
 
ट्रेंट ब्रिज १८९०

ट्रेंट ब्रिजचा वापर क्रिकेटसाठी पहिल्यांदा १८३० मध्ये केला गेला. पहिला नोंदणीकृत क्रिकेट सामना १८३८ मध्ये ट्रेंट ब्रिज इनच्या मागील मैदानी क्षेत्रात खेळवला गेला. [] ट्रेंट ब्रिजवर १८९९ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा प्रथम कसोटी सामना आयोजित केला गेला. ट्रेंट ब्रिज इनच्या मालकिणीचे पती विलियम क्लार्क [] यांनी १८४१ मध्ये यांनी ह्या मैदानाची स्थापना केली होती आणि तो स्वतः ऑल इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधारही होता. १९९० मध्ये त्यांच्या स्मरणार्थ रशक्लिफ सूटचा समावेश असलेल्या विल्यम क्लार्क स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले. वेस्ट ब्रिजफोर्डमधील वेस्ट पार्क स्पोर्ट ग्राउंड हे सर फर्लिअन कॅन यांचे एक खाजगी मैदान होते, जे एक फर्निचर मिलियनेअर होते, जे बऱ्याचदा यजमान राष्ट्रीय संघांचा पाहुणचार करित.

मैदान

संपादन

क्रिकेट विक्रम

संपादन

फुटबॉल

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b वेन-थॉमस, पीटर. "ट्रेंट ब्रिजचा थोडक्यात इतिहास". २१ एप्रिल २०१३ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन