ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल

जगातील देशनिहाय भ्रष्टाचाराचे गुणांकन करणारी संस्था

ट्रांसपरन्सी इंटरनॅशनल ही भ्रष्टाचारासंबंधी शोधकार्य करणारी जगातील एक प्रमुख संस्था आहे. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे, विविध संस्थांनी केलेले सर्वेक्षण आणि त्याविषयी उपलब्ध आकडेवारी, याची पडताळणी करून, ही संस्था जगातील बहुतेक सर्व देशांची एक यादी बनविते. त्यात कोणता देश भ्रष्टाचाराच्या कोणत्या क्रमांकावर आहे हे कळू शकते. ही यादी जगात मान्यताप्राप्त आहे. या यादीत सुमारे १७७ देश आहेत. दरवर्षी ही यादी प्रसिद्ध करण्यात येते.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल

मोजणी संपादन

यात प्रत्येक देशास, तेथील भ्रष्टाचार बघून ०(शून्य) ते १०० असे आकडे देण्यात येतात. ज्या देशास जितके जास्त अंक मिळतील तितक्या टक्केवारीने तो देश 'भ्रष्टाचारमुक्त' असे समजण्यात येतो. १०० अंक मिळविणारा देश संपूर्ण भ्रष्टाचारमुक्त समजण्यात येतो. तर, शून्य अंक मिळविणारा देश म्हणजे पूर्णतया भ्रष्ट असे समजतात.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "दैनिक तरुण भारत, नागपूर,दि. ४ डिसेंबर २०१३, मुख्य पान (१)". ४ डिसेंबर,२०१३ रोजी पाहिले. बातमी मथळा: भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीत... |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन