टिटवी किंवा लाल गाठीची टिटवी, ताम्रमुखी टिटवी, राम टेहकरी किंवा हटाटी (इंग्लिश:Redwattled Lapwing; हिंदी:टीटाई, टिटी) हा एक पक्षी आहे. याला संस्कृतमध्ये टिट्टिभ, टिट्टिभक किंवा कोयष्टिक म्हणतात. इंग्लिशमध्ये यास लॅपविंग असा शब्द आहे. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती जमिनीवरच तुरुतुरू चालते. जमीन उकरून त्यात अंडी घालते. टिट्‌-टिट्‌-ट्यूटिट्‌ असा आवाज काढून उडताना संकटाचा थोडा जरी संशय आला, तरी ती इतरांना सावध करते. टिटवा-टिटवी हे शब्द ज्ञानेश्वरीत दोनदा आले आहेत. संत एकनाथ यांनी टिटवी नावाचे भारूड लिहिले आहे.

टिटवी
Red wattled Lapwing I IMG 0596.jpg
शास्त्रीय नाव Vanellus indicus
कुळ टिट्टिभाद्य (Charadriidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Red-wattled Lapwing
हिंदी टिटहरी

कुररी नावाचा एक वेगळा पक्षी आहे.संस्कृतमध्ये तिला उत्क्रोश म्हणतात आणि इंग्रजीत ’इंडियन व्हिस्कर्ड टर्न. टिटवीप्रमाणेच हाही पक्षी नदीकाठच्या वाळूत अंडी घालतो. मराठी वाङ्‌मयात कुररीला टिटवा असे म्हटले आहे. कुररीचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात, पंचतंत्र, रघुवंश, कथासरित्सागर, भागवताचा अकरावा स्कंध आदी ठिकाणी आला आहे.

वर्णनसंपादन करा

टिटवी हा पक्षी सुमारे ३३ सें. मी. आकाराचा असून याची चोच लाल, डोके, गळा, छाती काळ्या रंगाची, त्या खाली पोटाकडे पांढरा रंग तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा, पाय लांबट पिवळ्या रंगाचे असतात आणि यांची मुख्य ओळख म्हणजे दोन्ही डोळ्यांजवळ लाल रंगाचे कल्ले. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

आवाजसंपादन करा

  टिटवीचा आवाज ऐका

वास्तव्य/आढळस्थानसंपादन करा

टिटवी पक्षी हिमालयाच्या १८०० मी. उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळणारा सर्वसामान्य पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इराण, इराक वगैरे देशांमध्येही आढळतो.

शेतीचे प्रदेश, मोकळे माळरान प्रदेश, उंच जंगलांच्या किनाऱ्यांजवळ, पाण्याच्याजवळ विशेषतः नदी, तलावांच्या किनाऱ्यांजवळ टिटवी पक्षी हमखास दिसून येतो.

खाद्यसंपादन करा

लहान-मोठे कीटक शंख-शिंपल्यातील जीव हे टिटवी पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळसंपादन करा

या पक्ष्यांच्या वीणीचा काळ साधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा असून मादी एकावेळी ३ ते ४ राखाडी किंवा राखाडी-तपकिरी रंगाची त्यावर काळे ठिपके असलेली अंडी देते. ही अंडी तलावांच्या, नदीच्या किनाऱ्याजवळील मोकळ्या मैदानात असतात. यांचे मुद्दाम बांधलेले घरटे नसते. अंड्यांजवळचा भाग सहसा खोलगट असतो आणि तेथे गारगोटी सारखे दगड असतात. यामुळे अंडी आणि दगडातील फरक चटकन ओळखता येत नाही. अंडी असतील त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केल्यास नर-मादी मोठ्याने आवाज करीत त्या विरुद्ध दिशेने उडून लक्ष दुसरीकडे वेधून घेतात.

इतरसंपादन करा

अनेक कथा-कविता-लोकगीतांमध्ये टिटवी पक्ष्यांचा उल्लेख आढळून येतो. पंचतंत्रच्या अनेक गोष्टीत टिटवीचा उल्लेख आहे.

चित्रदालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा