झारखंड संपर्क क्रांती एक्सप्रेस
१२८२५/१२८२६ झारखंड संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे झारखंडमधील रांचीच्या रांची रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. दक्षिण पूर्व रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या झारखंड संपर्क क्रांती एक्सप्रेसला रांची ते दिल्ली दरम्यानचे १३०७ किमी अंतर पार करायला २१ तास १५ मिनिटे लागतात.
तपशील
संपादनवेळापत्रक
संपादनगाडी क्रमांक | मार्ग | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|
१२८२५ | रांची – हजरत निजामुद्दीन | २३:४० | २०:५५ | सोम, गुरू |
१२८२६ | हजरत निजामुद्दीन – रांची | ०६:५५ | ०४:५५ | बुध, शनी |
मार्ग
संपादन- रांची
- मुरी
- बोकारो स्टील सिटी
- गोमोह
- हजारीबाग रोड
- कोडर्मा
- मुघलसराई
- कानपूर
- हजरत निजामुद्दीन