ज्ञानवापी मशीद

(ज्ञानवापी मस्जिद या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्ञानवापी मशीद बनारस, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे. १६६९ मध्ये जुने शिवमंदिर पाडून औरंगजेबाने ते बांधले होते. ज्ञानवापी मशीद ही सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच आहे.[][] या मशीदीचे नाव संस्कृत असून त्याचा अर्थ ज्ञानाचा तलाव किंवा ज्ञान कुंड असा होतो. ज्ञान+वापि, संस्कृत मध्ये वापि म्हणजे तलाव.[][][][]

ज्ञानवापी मशीद हे जेम्स प्रिन्सेपने बनारसचे विश्वेश्वर मंदिर म्हणून रेखाटले आहे. पाडलेल्या मंदिराची मूळ भिंत आजही मशिदीत उभी आहे.

इतिहास

काशी विश्वनाथ मंदिर आणि त्याला लागूनच असलेली ज्ञानवापी मशीद ही कोणी व कधी बांधली याबद्दल अनेक समजुती आहेत. पण ठोस स्वरूपाची ऐतिहासिक माहिती बरीच कमी आहे. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडलं होतं आणि तिथे मशीद बांधली होती.

४ थ्या व ५ व्या शतकाच्या दरम्यान दुसरा चंद्रगुप्त, ज्याला विक्रमादित्य म्हणूनही ओळखले जाते, त्याने गुप्त साम्राज्याच्या काळात काशी विश्वनाथ मंदिर बांधल्याचा दावा केला जातो.

इ.स. ६३५ मध्ये प्रसिद्ध चीनी प्रवासी ह्युएन त्सांग याने लेखनामध्ये मंदिर आणि वाराणसीचे वर्णन केले आहे.

इ.स. ११९४ ते ११९७ मध्ये महंमद घोरीच्या आदेशाने मंदिराचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे, इतिहासात विध्वंस आणि मंदिरांच्या पुनर्बांधणीची मालिका सुरू झाली आहे. अनेक हिंदू मंदिरे पाडली गेली व पुन्हा बांधली गेली.

इ.स. १६६९ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशाने, मंदिर अंतिम वेळी पाडण्यात आले आणि त्याच्या जागी ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली.

पुन्हा मराठा साम्राज्याच्या काळात इ.स. १७७६ ते ७८ मध्ये इंदूरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानवापी मशिदीजवळील सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.

1936 मध्ये, ब्रिटिश सरकारवर संपुर्ण ज्ञानवापी परिसरात नमाज अदा करण्याच्या अधिकारासाठी जिल्हा न्यायालयात खटला भरण्यात आला. दावेदारांनी सात साक्षीदार सादर केले, तर ब्रिटिश सरकारने पंधरा साक्षीदार दिले.

ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज अदा करण्याचा अधिकार १५ ऑगस्ट १९३७ रोजी स्पष्टपणे देण्यात आला, ज्यात अशी नमाज ज्ञानवापी संकुलात इतर कोठेही अदा करता येणार नाही असेही सांगण्यात आले.

उच्च न्यायालयाने १० एप्रिल १९४२ रोजी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत इतर पक्षांचे अपील फेटाळले.

पंडित सोमनाथ व्यास, डॉ रामरंग शर्मा आणि इतरांनी १५ ऑक्टोबर १९९१ रोजी वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी येथे नवीन मंदिर बांधण्यासाठी तसेच उपासनेचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी दावा दाखल केला.

या आदेशाला आव्हान देणाऱ्या अंजुमन इनाजानिया मस्जिद आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड लखनऊ यांच्या वतीने १९९८ मध्ये उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

७ मार्च २००० रोजी पंडित सोमनाथ व्यास यांचे निधन झाले

११ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणात वादी म्हणून माजी जिल्हा सरकारी वकील विजय शंकर रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

स्थापत्य

विवाद

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "समजून घ्या : १९९१ पासून सुरु असणारा काशी विश्वनाथ मंदिर – ज्ञानवापी मशीद वाद आहे तरी काय?". Loksatta. 2022-05-16 रोजी पाहिले.
  2. ^ "काशीतील ज्ञानवापी मशिद आणि श्रृंगार देवीच्या पुजेवरून झालेला वाद काय आहे?".
  3. ^ Bharatvarsh, TV9 (2022-05-17). "ज्ञानवापी से शिव का कैसा सरोकार? BHU की प्रोफेसर ने 'स्कंद पुराण' से बताया बड़ा कनेक्शन". TV9 Bharatvarsh (हिंदी भाषेत). 2022-05-18 रोजी पाहिले.
  4. ^ नवभारतटाइम्स.कॉम (2022-05-17). "Gyanvapi Masjid Mystery : ज्ञानवापी क्या है, इस रहस्य को जानकर हैरान रह जाएंगे". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2022-05-18 रोजी पाहिले.
  5. ^ "Gyanvapi Survey: 'ज्ञानवापी जैसा शब्द कुरान-इस्लाम में नहीं', सर्वे पर साक्षी महाराज ने कही ये बात". Zee News (हिंदी भाषेत). 2022-05-18 रोजी पाहिले.
  6. ^ "Sanskrit - Dictionary". www.learnsanskrit.cc. 2022-05-18 रोजी पाहिले.