जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

(जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (जुलै १२, १८६४ - जानेवारी ५, १९४३) हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्रावीण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

क्रिस्टल प्लेस जवळील न्यूटन काउंटी येथील डायमंड ग्रोव्ह येथे गुलामीच्या कार्व्हरचा जन्म झाला होता, ज्याला आता डायमंड, मिसुरी म्हणून ओळखले जाते, काही काळ 1860च्या दशकाच्या उत्तरार्धात. त्याच्या जन्माची नेमकी तारीख अनिश्चित आहे आणि कार्व्हरला ते माहित नव्हते. तथापि, अमेरिकन गृहयुद्धानंतर जानेवारी 1865 मध्ये मिसुरीमध्ये गुलामगिरी संपुष्टात आणण्यापूर्वीचे होते. त्याचा मालक, मोसेज कारव्हर हा जर्मन अमेरिकन परदेशी आहे ज्याने जॉर्जचे पालक मेरी आणि गिल्स यांना विल्यम पी. मॅकगनिस येथून 9 October ऑक्टोबर, 1855 मध्ये $7०० डॉलर्समध्ये खरेदी केले होते.

आपल्या प्रयोगशाळेत डॉ. कार्व्हर

मराठी चरित्रे

संपादन
 
विकिक्वोट
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.