जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

(जॉर्जियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Грузинская Советская Социалистическая Республика; जॉर्जियन: საქართველოს საბჭოთა სოციალისტური რესპუბლიკა) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.

जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
Грузинская Советская Социалистическая Республика (रशियन)
საქართველოს საბჭოთა სოციალისტური რესპუბლიკა (जॉर्जियन)

१९२११९९१
ध्वज चिन्ह
राजधानी त्बिलिसी
शासनप्रकार सोव्हिएत संघाचे गणराज्य
अधिकृत भाषा जॉर्जियन, रशियन, अबखाझ, ओसेटिक
क्षेत्रफळ ६९,७०० चौरस किमी
लोकसंख्या ५४,००,८४१
–घनता ७७.५ प्रती चौरस किमी

१९१७ सालच्या रशियन क्रांतीनंतर रशियन साम्राज्याचा अस्त झाला व जॉर्जियाने जॉर्जियाचे लोकशाही प्रजासत्ताक नावाच्या स्वतंत्र देशाची घोषणा केली. परंतु १९२० साली रशियाने केलेल्या यशस्वी आक्रमणानंतर हे राष्ट्र पुन्हा रशियाच्या अधिपत्याखाली आले व सोव्हिएत संघाचे गणराज्य बनवण्यात आले. २५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत जॉर्जियाचे पुन्हा स्वतंत्र जॉर्जिया देशामध्ये रूपांतर झाले.