जॅान हस (जन्म - इ.स. १३६९, मृत्यु - इ.स. १४१५) या जर्मनीतील प्राग विद्यापीठातील प्राध्यापकाने जॅान विक्लिफ पासून स्फूर्ती घेऊन धर्मसंस्थेवर जोरदार टीका केली. धर्मसंस्थेत सुधारणा घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन त्याने केले. या धर्मसुधारकाने बायबलचा खरा अर्थ लोकांच्यापुढे मांडला. त्याने ख्रिश्चन धर्मगुरूंचे दांभिक स्वरूप उजेडात आणले. त्याच्या प्रयत्नानेच धर्मसुधारणा चळवळ बोहेमिया प्रांतात पसरली. ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्याच्या धर्माविरोधी विचारांबद्दल त्याला देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. इ.स. १४१५ मध्ये त्याला जिवंत जाळण्यात आले.

जाॅन हस


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.