जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात, माधव गडकरी (सन १९९४ ते १९९९) आणि राधाकृष्ण नार्वेकर (सन १९९९ ते २००२) हे या संस्थेचे कार्याध्यक्ष होते. संस्थेची रीतसर नोंदणी २४-८-२००२ला झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा’ या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली.

शोध मराठी मनाचा या नावाची आत्तापर्यंतची संमेलने

संपादन

१. २००४ - नागपूर
२. २००५ -अहमदनगर
३. २००६ - मुंबई
४. २००७ - एम्‌आय्‌टी मायर्स, पुणे--६-७ जानेवारी
५. २००८ - कला अकादमी, पणजी(गोवा)-- ४-५-६ जानेवारी
६. २००९ - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर -- ३-४- जानेवारी
७. २०१० - हुतात्मा स्मृति मंदिर, सोलापूर -- २-३ जानेेवारी
८. २०११ - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद -- ७-८-९ जानेवारी
९. २०१२ - विरार
१०. २०१३ - कालिदास कलामंदिर, नाशिक -- ५-६ जानेवारी; अध्यक्ष आशुतोष गोवारीकर
११. २०१४ - रत्‍नागिरी
१२. २०१५ - सातारा
१३. २०१६ - अमरावती
१४. २०१७ - शिवाजी नाट्यमंदिर, दादर, मुंबई
१५. २०१८ - पुणे
१६. २०१९ - नागपूर
१७. २०२० - पीएनपी नाट्यगृह चेंढरे, अलिबाग
१८. २०२३ - डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी

हे सुद्धा पहा

संपादन

website- http://www.jagtikmarathiacademy.org[permanent dead link]