जाक शिराक
जाक शिराक (फ्रेंच: Jacques Chirac; २९ नोव्हेंबर, इ.स. १९३२) हा इ.स. १९९५ ते २००७ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्यापूर्वी तो इ.स. १९७४-७६ व १९८६-८८ दरम्यान दोन वेळा फ्रान्सचा पंतप्रधान तर इ.स. १९७७ ते १९९५ दरम्यान पॅरिस शहराचा महापौर होता. ह्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी फ्रेंच सरकारात त्याने अनेक मंत्रीपदे भुषविली होती.
जाक शिराक | |
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ १७ मे, १९९५ – १६ मे, २००७ | |
मागील | फ्रांस्वा मित्तरॉं |
---|---|
पुढील | निकोला सार्कोझी |
जन्म | २९ नोव्हेंबर, १९३२ पॅरिस, फ्रान्स |
गुरुकुल | हार्वर्ड विद्यापीठ |
सही |
पॅरिसचा महपौर असताना चिराकने केलेल्या भ्रष्टाचारांच्या अनेक आरोपांवरून त्याला फ्रेंच कोर्टाने २ वर्षांची स्थगित शिक्षा सुनावली. परंतु त्याच्या वयाचा विचार करता तुरूंगवास भोगण्यापासून त्याची मुक्तता केली गेली आहे.
बाह्य दुवे
संपादन- व्यक्तिचित्र Archived 2012-01-19 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |