राजाराम द्वितीय

(छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) या पानावरून पुनर्निर्देशित)




दुसरे राजाराम (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) हे १८ ऑगस्ट १८६६ ते ३० नोव्हेंबर १८७० पर्यंत कोल्हापूर संस्थानचे राजा होते. तिसऱ्या शिवाजींना औरस पुत्र नसल्याने पाटणकरांकडील दुसऱ्या राजारामला दत्तक घेतले. हा मोठा देखणा, शहाणा आणि इंग्रजी बोलणारा होता. राजाराम महाराजांची यूरोप-यात्रा केली. परत येताना फ्लॉरेन्स (इटली) या शहरात ते मरण पावले (१८७०). त्यांची छत्री तेथे आहे. इटलीतील मंत्र्यांच्या परवानगीने अरव नदीच्या काठावरच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यामागे शिवाजी सहावा गादीवर आला.

छत्रपती राजारामराजे भोसले (दुसरा राजाराम)
छत्रपती
छत्रपती दुसरे राजाराम भोसले यांचे अस्सल चित्र
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ इ.स. १८६६ - इ.स. १८७०
राज्यव्याप्ती कोल्हापूर संस्थान पर्यंत
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव छत्रपती राजारामराजे भोसले
जन्म इ.स. १३ एप्रिल १८५०
कोल्हापूर
मृत्यू इ.स. ३० नोव्हेंबर १८७०
पूर्वाधिकारी छत्रपती पाचवे शिवाजीराजे भोसले (पाचवा शिवाजी)
उत्तराधिकारी छत्रपती सहावे शिवाजीराजे भोसले
राजघराणे भोसले