चेल्याबिन्स्क उल्का

२०१३ मध्ये रशियावर पडलेला पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह

चेल्याबिन्स्क उल्का ही उल्का १५ फेब्रुवारी २०१३ रोजी रशिया मधील चेल्याबिन्स्क प्रांतात पृथ्वीच्या वातावरणात शिरली. ताशी ६५,००० किमी वेगाने आदळल्यामुळे तिचा वातावरणात ३० किमी उंचीवर स्फोट झाला. त्यामुळे वायू आणि धुराचे गरम ढग तयार झाले, सूर्याच्या ३० पट मोठा प्रकाश तयार होऊन ५०० किलोटन टीएनटी इतकी गतिज ऊर्जा तयार झाली. ३११ मुले मिळून १५०० माणसे जखमी झाली, ७२०० इमारतींचे नुकसान झाले.

ठिकाण
वातावरणातील मार्ग
नुकसान