चांदपुर जलाशय हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी स्थित असलेले एक नैसर्गिक जलाशय (तलाव) आहे. या जलाशयाच्या पाण्याचा वापर तालुक्यातील शेतकरी भातशेतीसाठी व गावातील नागरिक नळाद्वारे पिण्यासाठी करतात. या जलाशयाला ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या ठिकाणी पर्यटन जोरदार सुरू होते.[१] जलाशयाचा पाणी सोडण्याचा दरवाजा ब्रिटीशकालीन आहे. या दरवाज्यातूनच सिंचनासाठी पाणी सोडले जाते.[२]

चांदपुर जलाशय

भंडारा जिल्ह्यातील नंदनवन म्हणून या स्थळाची ओळख आहे. या स्थळाला ग्रीन व्हॅली चांदपुर या नावाने ओळखले जाते.[३]

नौकानयन संपादन

 
चांदपुर जलाशय व चांदपुरच्या टेकड्या

चांदपुर जलाशयाच्या पर्यटन दृष्ट्या विकासासाठी नौकानयनाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. याकरिता स्थानिकांनी वेळोवेळी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे मागणी करत आहेत. यामुळे पर्यटक चांदपुर जलाशयाकडे आकर्षित होतील. चांदपूर गावात हनुमान देवस्थान, ऋषीमुनी आश्रम, चांदशाहवली दर्गा आहे. या संपूर्ण परिसराचा विकास केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.[४]

संदर्भ संपादन

  1. ^ author/lokmat-news-network (2019-12-10). "हिवाळी अधिवेशनात पर्यटन विकासाची अपेक्षा". Lokmat. 2023-01-11 रोजी पाहिले.
  2. ^ author/lokmat-news-network (2019-11-30). "चांदपूर जलाशयाच्या पाण्याचा अपव्यय". Lokmat. 2023-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ author/lokmat-news-network (2019-09-12). "ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचे सौंदर्य खुलणार". Lokmat. 2023-01-11 रोजी पाहिले.
  4. ^ author/lokmat-news-network (2019-09-12). "ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचे सौंदर्य खुलणार". Lokmat. 2023-01-11 रोजी पाहिले.