तुमसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तुमसर हे नाव "तुम" या मासोळी वरून पडले आहे. ही मासोळी आधी इथे आढळत होती. हे शहर आधी "कुबेर नगरी" म्हणुन ओळखले जायचे. तुमसर ही तांदळाची मोठी बाजारपेठ आहे आणि सुगंधीत तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. या गावात एकूण २१ राइस मिल आहेत.त्यात धानापासुन तांदुळ तयार करतात."तुमसर रोड" हे नागपूर - कोलकाता या रेल्वे मार्गावर असलेले मुख्य रेल्वे स्थानक या शहरापासुन सुमारे ५ कि.मि. अंतरावर आहे.त्याशेजारीच असलेल्या "तुमसर टाऊन" रेल्वे स्थानकावरून रेल्वेमार्गाची शाखा तिरोडीस गेली आहे. या रेल्वेमार्गावरून तिरोडी, डोंगरी,चिखला मार्गे मध्य प्रदेशातील कटंगी जवळ असलेल्या मॅंगेनिझ ओर ऑफ इंडियाच्या खाणींमधुन मॅंगेनिझ वाहतूक होते.

गणपती

संपादन
 
तुमसरेश्वर महागणपती, तुमसर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहराचे भूषण असलेला तुमसरेश्वर महागणपती दगडूशेठ गणपती पुणे येथील पूर्णाकृती आहे. हा मंदिर मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहरात सर्व देवी देवतांची मंदिरे आहेत. मात्र गणपतीचे स्वतंत्र असे मंदिर नव्हते ही उणीव भरून काढण्यासाठी गणेशाने बऱ्याचे लोकांना प्रेरणा दिली. पण ही प्रेरणा प्रत्यक्षात कुणाला साकार करता आली नाही. शेवटी तुमसर शहरातील धान्य व्यापारी स्व. श्यामकुमार अग्रवाल व काही धान्य व्यापारी आणि गणेश भक्तांकडून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली बारदारी म्हणजे जुना गंज बाजार, इंग्रज काळातील जुनी इमारत तत्कालीन नगर पालिकेने गणेश मंदिरासाठी दिली. व्यापारी एकत्र आले आणि २००० या वर्षी मंदिराला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. पुण्याच्या दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असलेली संगमरवरी महागणपतीची प्रसन्न अशी महाकाय मुर्ती अंदाजे सव्वालाख रुपये खर्च करून जयपूरवरून आणण्यात आली. २६ फेब्रुवारी २००० मध्ये भगवान गणेशाच्या ५१ इंच उंच असलेल्या मुर्तीची विधीवत पूजापाठाने व मंत्रोपचाराने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिराचे प्रमुख पुजारी वसंतराव गाडगीळ आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तांच्या उपस्थितीत गणेशाची स्थापना करण्यात आली होती.  सिंहासनाधिष्ठित महागणपतीचा मुकुट सोन्याचा मुलामा चढवलेला आहे. मंदिर इमारतीवर कळस बांधण्यात आले. मंदिराची व्यवस्था सध्या काही व्यापारी मंडळी पाहत आहे. गेल्या २२ वर्षात जुन्या गंज बाजारातील महागणपतीची ख्याती एवढी वाढली की रोज दर्शनाला गर्दी असते. एक प्रकारे जत्रेचे स्वरूप असते. आता तर नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा म्हणून सदर मंदिर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळात दर्शनासाठी लांब रांगा लागत असतात. तुमसर, तिरोडामोहाडी तालुक्याचे ते आराध्य दैवत आहे.[]

बाह्य दुवे

संपादन
भंडारा जिल्ह्यातील तालुके
भंडारा तालुका | साकोली तालुका | तुमसर तालुका | पवनी तालुका | मोहाडी तालुका | लाखनी तालुका | लाखांदूर तालुका
  1. ^ "Digital Bhandara". hi-in.facebook.com (हिंदी भाषेत). 2022-12-25 रोजी पाहिले.