@अभय नातू, सुबोध कुलकर्णी, आणि Tiven2240: नमस्कार! हा लेख आपण वाचून पहावा. आपणाला आवश्यक वाटतील त्या सूचना कराव्यात. हा विषय विस्तृतपणे मांडणेही शक्य आहे. पण प्रसंगी विषयाचे काठिण्य आणि तत्वज्ञानाचा भाग लक्षात घेता आवश्यक आणि योग्य माहिती संदर्भासह नोंदविली जाईल असा प्रयत्न केला आहे. शक्य झाल्यास आपण साचाही काढून टाकावा ही विनंती. साचा मीच लावला आहे. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) ११:२८, ८ जून २०१८ (IST)Reply

उत्पाती कि? काय? : विपश्यना/विपस्सना एक चर्चा!

संपादन

@अभय नातू, सुबोध कुलकर्णी, आर्या जोशी, आणि Tiven2240:

  • या ठिकाणी आर्या जोशी यांनी विचारलेला प्रश्न ह्या लेखाविषयी असावा असे मला वाटले. म्हणून मी येथे सर्वांना साद देत आहे.
  • या ठिकाणच्या इतिहासात आर्या जोशी यांनी केलेले बदल आपण पाहू शकतो.
  • त्यातील काही मजकूर @संदेश हिवाळे: यांनी या आवृत्तीमध्ये परस्पर काहीही कारण न देता काढून टाकलेला दिसतो.
  • कुठलिही चर्चा किंवा पुर्वसुचना किंवा कारण न देता. संदेश हिवाळे यांनीच शिवाय मराठी विकीवर लेखाचे नाव विपश्यना असताना ते पाली भाषेतील नाव देऊन लेख पुर्ननिर्देशित विपस्सनाकडे नेला.
  • ते पुर्ननिर्देशन @: यांनी या आवृत्तीमध्ये हटवले, तेही कुठलेही कारण न देता किंवा कसलीही चर्चा न करता.
  • आता विपश्यना आणि विपस्सना असे दोन लेख झालेले आहेत आणि त्यावरील मजकूरही वेगवेगळा आहे.
  • तेव्हा अश्या दोन लेखांचे प्रयोजन काय? आणि एकत्र करावे तर कसे आणि मराठी विकीवर मराठी नावाने लेख लिहिले जावेत की, पाली? WikiSuresh (चर्चा) २३:०२, २३ जून २०१८ (IST)Reply
@Sureshkhole: त्यातील काही मजकूर @संदेश हिवाळे: यांनी या आवृत्तीमध्ये परस्पर काहीही कारण न देता काढून टाकलेला दिसतो. यातील "आवृत्ती" आर्या जोशींची आहे, माझी नव्हे!!--संदेश हिवाळेचर्चा १७:५८, २६ जून २०१८ (IST)Reply

@अभय नातू, V.narsikar, आणि Tiven2240:,लेखाच्या शीर्षकाविषयी मी विपस्सना चर्चा पानावर ६ जून रोजी लिहिले आहे. त्यानंतरही वरील प्रकार घडले आहेत याची दखल घ्यावी. लेखनावाविषयी निर्णय लवकर व्हावेत असे वाटते. आता दोन्ही लेखातील मजकूर एकत्र करून उचित नावाने लेख ठेवावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:४५, २५ जून २०१८ (IST)Reply

विपस्सना या पानावरील मजकूर विपश्यना/इतरत्र सापडलेला मजकूर येथे हलविला आहे. तेथून योग्य ते बदल करुन या लेखात समाविष्ट करावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०६:५७, २६ जून २०१८ (IST)Reply

इतरत्र सापडलेला मजकूर

संपादन

बौद्ध संप्रदायात गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या ध्यान पद्धतीला विपश्यना असे म्हटले जाते. गौतम बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय.[]

अष्टांग मार्ग

संपादन

समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी उपासकाला बुद्धाने आठ मार्ग आचरायला सांगिले आहेत. समाधी म्हणजे ध्यानाची अवस्था. अष्टांग मार्गाचे आचरण करून स्वतःला अधिक प्रसन्न ठेवणे आणि जीवनाची वास्तवता स्वीकारणे हे तंत्र विपश्यना साधन प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग मानले जाते.[]

विपश्यना ध्यान प्रक्रियेचा उगम आणि इतिहास

संपादन

गौतम बुद्धाने स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शिष्यगणांना सांगितली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या शिष्यसमुदायाने जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार केला. भारतात ही ध्यान पद्धती सुमारे पाचशे वर्षे आचरली गेली, त्यानंतर मात्र ती लोप पावू लागली. तथापि म्यानमारमध्ये काही उपासक समुदायाने ही पद्धती आचरणे सुरूच ठेवले होते.

ब्रह्मदेशातल्या सयागयी उ बा खिन या वरिष्ठ उपासक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीने ही उपासना पद्धती जगभरात पुनरुज्जीवित केली.[]

 
गोराई (मुंबई) येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्र

पुनरुज्जीवन आणि प्रसार

संपादन

सयागयी उ बा खिन यांनी आपल्या रंगून येथील केंद्रात परदेशी व्यक्ती आणि म्यानमारमधील स्थानिक व्यक्ती यांना या ध्यान पद्धतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मूळ भारतीय वंशाचे असलेले व्यावसायिक श्री. सत्यनारायण गोयंका हे आपल्या कुटुंबासह म्यानमारमध्ये राहत असत. त्यांनी या केंद्रात विपश्यना ध्यान पद्धती शिकून घेतली. आपले आचार्य सयागयी उ बा खिन यांच्याकडूढून चौदा वर्षे ही ध्यान पद्धती शिकून, आत्मसात करून आणि आपल्या गुरूंना ती इतरांना शिकविण्यात सहकार्य करून श्री. गोयंका हे इ. स. १९६९ मधे भारतात आले. गौतम बुद्धाच्या मूळ भूमीत म्हणजे भारतात या ध्यानपद्धतीचे पुनरुज्जीवन आणि भारतात तसेच जगभरात प्रसार करण्याचे काम श्री. गोयंका यांच्यावर गुरूंनी सोपविले. त्यानुसार श्री. गोयंका यांनी प्रथम भारतात, आणि नंतर भारताबाहेर ही पद्धती शिकविण्याचे वर्ग सुरू केले. संपूर्ण समर्पित भावनेने चालणारी अशी केंद्रे आज भारतात आणि भारताबाहेर सुरू आहेत.[]

 
पुणे येथील एक विपश्यना केंद्र

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Bickell, George D. (2011-09-12). Vipassana-Meditation - Insight-Meditation (जर्मन भाषेत). Satzweiss.com. ISBN 9783902458063.
  2. ^ a b Hetherington, Ian (2011-12-15). Realizing Change: Vipassana Meditation in Action (इंग्रजी भाषेत). Pariyatti Publishing. ISBN 9781928706953.

वर्ग:बौद्ध उपासना पद्धती वर्ग:बौद्ध धर्म Khirid Harshad (चर्चा) २१:१५, २५ ऑक्टोबर २०२३ (IST)Reply

"विपश्यना" पानाकडे परत चला.