चर्चा:मासिक पाळी

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic नकल डकव

विनंती संपादन

आर्या जोशी मॅडम, तुम्ही हा लेख चांगला लिहिलाय. पण एक छोटासा बदल सुचवासा वाटतो, लेखात विभाग पाडण्यापूर्वी सुरूवातीलाच 'मासिक पाळी' म्हणजे काय असते? याची प्राथमिक माहिती लिहणे उपयक्त ठरू शकते. त्यानंतर विविध मूद्द्यांवर विभाग/उपविभाग असावेत असे मला वाटते. तसेच हा लेख मुख्यत्वे धार्मिक दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे परंतु येथे वैज्ञानिक दृष्टिकोनातील माहिती उपलब्ध असणेही महत्त्वाचे आहे. --संदेश हिवाळेचर्चा १२:०१, १३ मे २०१७ (IST)Reply

लेखातील तक्ते संपादन

हे तक्ते जसेच्या तसे इंग्रजीतून घेतलेले आहेत. हे मराठीत इथल्या परिप्रेक्ष्यात करण्याची गरज आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:५७, २६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

धार्मिक भाग काढून टाकला संपादन

https://en.wikipedia.org/wiki/Menstrual_taboo#Hinduism कृपया हा लेख पहावा असा दुसरा लेख आपल्याला तयार करता येईल तेथे हिच माहिती घालता येईल जी मी इथून काढून टाकली आहे. शिवाय त्यात नविन भर प्रत्येक धर्माच्या विचारांचीही जोडता येऊ शकते. सध्याच्या ह्या लेखामध्ये आपण फ़क्त मासिक पाळी विषयीची शास्त्रीय माहितीच ठेवूयात. WikiSuresh (चर्चा) १८:३७, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

बाह्य दुवे मध्ये मी विविध धर्मात मासिक बद्दलचे मते याचा दुवा /लिंक दिलेली आहे. --संदेश हिवाळेचर्चा १८:५७, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

इथे धर्म नकोच, तो काढून वेगळा लेख करूयात, तेच बरे पडेल, उगाच बायकांना फ़ालतू धर्माच्या कल्पनांनी बाजूला कश्याला बसवायचे आणि शिवाय नविन लेखही इंग्रजी सारखा ’पाळीविषयीचे गैरसमज’ वगैरे असा काहिसा करुयात. WikiSuresh (चर्चा) १९:१६, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

नकल डकव संपादन

या लेखात या आवृत्ती पासून या आवृत्ती पर्यंत नकल डकव केलेले आहे. सदर नकल डकव सुमारे ९२.१ % असून ते येथून उतरवले आहे त्याचा कार्बन डेटिंग अहवानुसार निर्मिती सन २०१५ असून नकल डकव @Pooja Jadhav: यांनी केलेली आहे. तरी उचित कार्यवाही करावी ही विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) २१:१४, ५ जून २०१८ (IST)Reply

हा मजकूर विकासपीडियावरुन घेतलेला आहे. सी-डॅकच्या या उपक्रमावर खालील नोंद आहे -
या पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती, मेलद्वारे आमची पूर्वपरवानगी घेतल्यानंतर विनामुल्य पुनर्वापर करता येऊ शकते
@Pooja Jadhav:, अशी परवानगी घेतली आहे का हे लगेचच कळवावे.
अभय नातू (चर्चा) २१:४६, ५ जून २०१८ (IST)Reply
"मासिक पाळी" पानाकडे परत चला.