चर्चा:भेंडी

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by प्रसाद साळवे
@Pooja Jadhav: सदर लेखात प्रताधिकार मजकूर असण्याची शक्यता आहे. लेखातील साच्यातील लिंक बघून खात्री करावी . व लेखात सुधारणा करून साचा हटवावा. धन्यवाद प्रसाद साळवे (चर्चा) १०:१९, १ जून २०१८ (IST)Reply


@Pooja Jadhav, Sureshkhole, अभय नातू, Tiven2240, आणि सुबोध कुलकर्णी:

१.मी या लेखात प्रताधिकार साचा लावला होता. व पूजा जाधव यांना साद दिली होती.
२. त्यांनी त्यास प्रतिसाद देत लेखातील भाग वगळून सुधारणा केली.(फक्त लागवड विभाग शिल्लक आहे तो त्यांच्या नजरचुकीने लक्षात आला नसावा इथे
३. लेखातील दुरुस्ती पूजा यांच्याकडून झाली.
४. यात कोणत्याही प्रकारे दृश्यता लपवावी लागली नाही.
५. पूजा यांनी पेस्ट केलेला मजकूर त्यांनीच हटवल्या मुळे त्यांना पुरेसा वेळ मिळाला.
६. मजकूर वगळे पर्यंत प्रचालकांना यात लक्ष देण्याची गरज पडली नाही. कंटेंटही सुधारला, पर्यायाने सर्वांचाच वेळ वाचला व कटुता पण आली नाही.

काम असे देखील करता येऊ शकते. त्यासाठी चर्चा:महाड सत्याग्रह प्रमाणे झालेच पाहिजे असे नाही.
आशा आहे वरील चर्चेत मी फक्त उदाहरण हे प्रसंगासह दिले आहे. यावर देखील प्रती चर्चा होऊ नये. व पुढे असेच काम होईल अशी आशा.

पूजा यांचे मनापासून आभार त्या येथील मजकूरही काढतील या आशेसह

धन्यवाद प्रसाद साळवे (चर्चा) ०२:५९, २ जून २०१८ (IST)Reply

@Pooja Jadhav आणि प्रसाद साळवे:
जर सदस्यांनी एकमेकांच्या लिखाणाकडे लक्ष देउन प्रताधिकारित मजकूर काढला तर सोन्याहून पिवळे.
हे केल्याबद्दल सदस्य Pooja Jadhav आणि प्रसाद साळवे यांना धन्यवाद.
असा मजकूर काढल्यावर हा मजकूर असलेली संपादने इतिहासातून काढण्यासाठीयेथे प्रचालकांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.
या अनुषंगाने -
जर प्रचालकांचे लक्ष या लेखाकडे गेले असते (किंवा वेधले गेले असते) तर त्यांनी प्रताधिकारित मजकूर उडवला असता. असे करण्यात प्रचालक लेख कोणता, तो कोणी लिहिला यात भेदभाव करत नाहीत.
इतर सदस्यांनीही असे करणे अपेक्षित आहे परंतु आपण काय करावे हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे.
अभय नातू (चर्चा) ०३:१७, २ जून २०१८ (IST)Reply
ता.क. :@Pooja Jadhav: - कोणती संपादने प्रताधिकारित मजकूर काढण्यासाठी होती? संपादन करताना आढावा नसल्याने कळायला मार्ग नाही. हे कळवल्यास इतिहासातून वगळता येतील.


आपण म्हणता ते नीट समजले नाही परंतु ते येथे असावे.

प्रसाद साळवे (चर्चा) ०३:२५, २ जून २०१८ (IST)Reply

समजून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद प्रसाद साळवे (चर्चा) ०३:१९, २ जून २०१८ (IST)Reply
"भेंडी" पानाकडे परत चला.