चर्चा:दिवस अमेरिकेचे (पुस्तक)

Latest comment: ५ महिन्यांपूर्वी by राजेन्द्र क्षत्रिय in topic लेखन

लेखन

संपादन

@राजेन्द्र क्षत्रिय:

नमस्कार. तुमच्या मराठी विकिपीडियावरील लेखनाबद्दल धन्यवाद.

तुमच्यासाठी काही सूचना आणि प्रश्न --

  1. तुम्ही आपल्या ओळखीच्या किंवा नात्यातील व्यक्तीच्या पुस्तकांबद्दलचे लेख लिहीत असल्याचे दिसते. असे करताना व्यक्तीस्तुती किंवा जाहिरातबाजी होऊ नये याची आवर्जून काळजी घ्यावी.
  2. लेख लिहिताना इतर लेख वाचून त्या स्वरुपाचे लेखन करावे, उदा. प्रस्तावना, वर्गीकरण, साचे, इ.
  3. या लेखाबद्दल --
  1. या पुस्तकाला जेष्ठ मराठी लेखिका सिसिलिया कार्व्हालो यांची पाठराखण लाभलेली आहे. -- म्हणजे काय?
  2. मुलीच्या प्रसुतीनिमित्ताने अमेरिकेला गेलेल्या एका सर्वसामान्य आईला अमेरिकेत आलेले अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. -- अमेरिकेत गेलेली कोणतीही भारतीय आई ही सर्वसामान्य कशी असू शकते?! या नक्कीच अतिअल्पमतातील (अत्यल्प?) आहेत.

या लेखात तर बदल करालच पण या प्रकारचे मोघम लिखाण इतरत्र सुद्धा टाळावे ही विनंती.

पुन्हा एकदा धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ००:१८, २० जुलै २०२४ (IST)Reply

धन्यवाद
आपल्या सूचनेप्रमाणे लेखात बदल केले आहेत. आभार राजेन्द्र क्षत्रिय (चर्चा) ११:०३, २० जुलै २०२४ (IST)Reply
"दिवस अमेरिकेचे (पुस्तक)" पानाकडे परत चला.